TRENDING:

Astrology: शनी महाराज आता नशिबाचे दरवाजे उघडणार; या 5 राशींना होणार प्रचंड फायदा

Last Updated:
Mool Trikon Rajyoga 2024 : ग्रहांच्या शुभ-अशुभ स्थितींचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. शुभ स्थानातील ग्रह आपले नशीब पालटतात. ज्योतिषी पंडित योगेश चौरे यांच्या मते, बुध ग्रहाने 23 सप्टेंबर 2024 रोजी कन्या राशीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे शुक्र आधीपासूनच त्याच्या स्वराशीत आहे आणि शनि कुंभ राशीत आहे. अशा स्थितीत बुध स्वराशीत आल्यानं मूळ त्रिकोण राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे पाच राशीच्या लोकांना प्रचंड फायदा होणार आहे.
advertisement
1/5
शनी महाराज आता नशिबाचे दरवाजे उघडणार; या 5 राशींना होणार प्रचंड फायदा
मेष - या राशीच्या लोकांना मूळ त्रिकोण राजयोगाचा पूर्ण लाभ मिळू शकतो. आपली आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरी करत असाल तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. व्यापारी असाल तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.
advertisement
2/5
कन्या - या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. आपले कोणतेही काम आर्थिक परिस्थितीमुळे रखडले असेल तर ते आता पूर्ण होणार आहे. कारण मूल त्रिकोण राजयोगामुळे आपला काळ बदलणार आहे.
advertisement
3/5
तूळ - हा काळ आपल्यासाठी खूप शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित फायदे मिळतील. तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळवून देणारा करार होऊ शकतो. याशिवाय नोकरदार लोकांना प्रमोशन किंवा नवीन ऑफर देखील मिळू शकतात.
advertisement
4/5
कुंभ - या राशीच्या लोकांना आता त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. पूर्वी केलेलं काम, ज्याची आपण आशादेखील सोडलेली, त्यातून अचानक लाभ मिळेल. या राशीचा स्वामी शनी आहे आणि तो आता आपल्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला नोकरीच्या संधीही मिळतील.
advertisement
5/5
मीन - या राशीच्या लोकांनाही चांगली बातमी मिळू शकते. विशेषत: जे लोक वडिलोपार्जित मालमत्ता मिळविण्यासाठी न्यायालयीन खटल्यांमध्ये बराच काळ अडकले होते. नोकरदारांचा पगार वाढू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: शनी महाराज आता नशिबाचे दरवाजे उघडणार; या 5 राशींना होणार प्रचंड फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल