TRENDING:

एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं, या राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती

Last Updated:
Shani Sade Sati : मेष राशीवरील शनीची साडेसाती २०२५ मध्ये सुरू झाली असून ती २०३२ पर्यंत चालणार आहे. साडेसात वर्षांचा हा काळ जीवनात मोठे परिवर्तन घडवणारा मानला जातो.
advertisement
1/5
तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं! या राशीच्या मागे कडक शनि साडेसाती लागणार
मेष राशीवरील शनीची साडेसाती २०२५ मध्ये सुरू झाली असून ती २०३२ पर्यंत चालणार आहे. साडेसात वर्षांचा हा काळ जीवनात मोठे परिवर्तन घडवणारा मानला जातो. या काळात व्यक्तीला अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो, पण याच काळात त्याची विचारशक्ती, संयम आणि निर्णयक्षमता अधिक मजबूत होते. मेष राशी सध्या साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात असून पुढील सात वर्षे त्यांच्यासाठी शिकण्याचे, परिक्षांचे आणि शेवटी यशाचे ठरणार आहेत.
advertisement
2/5
पहिला टप्पा (२०२५ ते २०२७) : मानसिक संघर्ष आणि आत्मचिंतनाचा काळ हा टप्पा ‘उदय चरण’ म्हणून ओळखला जातो आणि मनावर त्याचा सर्वाधिक प्रभाव पडतो. या काळात मेष राशीच्या लोकांना अनावश्यक चिंता, अस्वस्थता आणि मानसिक दडपण जाणवू शकते. काही वेळा योजना आखल्या जातील, परंतु मन त्यास सहमत होणार नाही. झोपेची कमतरता किंवा जास्त विचार करणे यामुळे मन थकलेले वाटेल. मात्र हाच काळ तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची आणि आपल्या विचारांची दिशा निश्चित करण्याची संधी देतो. तुम्ही काय हवे आहे, कोणत्या दिशेने पुढे जायचे आणि कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे स्पष्टपणे दिसू लागते.
advertisement
3/5
दुसरा टप्पा (२०२७ ते २०२९) : कठीण परीक्षा आणि संघर्षाचा काळ हा साडेसातीचा सर्वात आव्हानात्मक टप्पा मानला जातो. या काळात पैसा, करिअर आणि आरोग्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये चढउतार दिसू शकतात. मेहनत अधिक आणि परिणाम कमी असतील, जबाबदाऱ्या अचानक वाढतील आणि नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. शरीरही लवकर थकू शकते किंवा आरोग्याशी संबंधित काही किरकोळ अडचणी निर्माण होऊ शकतात. पण हाच तो काळ आहे जो तुम्हाला खऱ्या अर्थाने सक्षम बनवतो. संयम, प्रामाणिकपणा आणि शिस्त या गुणांची कसोटी याच काळात लागते. तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावे हे शिकता.
advertisement
4/5
तिसरा टप्पा (२०२९ ते २०३२): प्रगती, स्थैर्य आणि समाधानाचा काळ या टप्प्यात परिस्थिती हळूहळू सुधारू लागते. जे काम आधी अडथळ्यांमुळे थांबले होते, ते आता पुढे सरकू लागतात.
advertisement
5/5
तसेच आर्थिक स्थिती सुधारते, करिअरमध्ये स्थैर्य येते आणि वैयक्तिक आयुष्यातील तणाव कमी होतो. मनातील अस्वस्थता कमी होते आणि आत्मविश्वास परत येतो. मागील काही वर्षांत केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळू लागते. हा काळ नव्या आत्मविश्वासाचा आणि आत्मविकासाचा असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं, या राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल