TRENDING:

फक्त काही तास शिल्लक! या 3 राशींना संध्याकाळी मिळणार गुड न्यूज, सूर्याचं नक्षत्र परिवर्तन

Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य हा शक्ती, आत्मविश्वास, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि अहंकाराचा कारक ग्रह मानला जातो.
advertisement
1/6
फक्त काही तास शिल्लक! या 3 राशींना संध्याकाळी मिळणार गुड न्यूज
ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य हा शक्ती, आत्मविश्वास, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि अहंकाराचा कारक ग्रह मानला जातो. आज म्हणजेच 19 नोव्हेंबर 2025 रोजी सूर्यदेवाने आपले नक्षत्र बदलले असून, सूर्य विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून आपल्या पुत्र शनिदेवाच्या अनुराधा नक्षत्रात प्रवेश केला आहे. डिसेंबरपर्यंत सूर्य या नक्षत्रातच भ्रमण करणार आहे.
advertisement
2/6
सूर्य आणि शनि या दोन्ही ग्रहांचा स्वभाव परस्परांपेक्षा वेगळा असूनही, त्यांच्या उर्जांचा मिलाफ झाल्यावर जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल घडतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. यामुळे या काळात अनेकांची रखडलेली कामे पूर्ण होणे, करिअरमध्ये प्रगती होणे आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते. सर्व १२ राशींवर या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम होईल, मात्र तीन राशींना विशेष धनलाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
मिथुन -  सूर्याच्या अनुराधा नक्षत्रातील प्रवेशामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ होणार आहे. विशेषतः करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात शुभ संकेत पुढे दिसत आहेत. नोकरीत प्रमोशन किंवा सन्मान मिळण्याची शक्यता अधिक आहे. काहीजणांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगल्या संधींचा लाभ होईल. बराच काळ अडलेली कामे वेगाने पूर्ण होतील आणि आर्थिक स्थितीही हळूहळू मजबूत होईल. प्रवासातूनही लाभ मिळू शकतो.
advertisement
4/6
वृश्चिक - वृश्चिक राशींसाठीही सूर्यदेवाचा हा नक्षत्र बदल अत्यंत शुभ काळ घेऊन येत आहे. नोकरीत स्थिरता आणि प्रगती दोन्ही मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरू शकतो. सरकारी कामे, कागदपत्रे, किंवा योजनांशी संबंधित फायदे प्राप्त होतील. मित्र, सहकारी आणि कुटुंबीयांच्या सहकार्याने अनेक अडथळे दूर होतील. आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
advertisement
5/6
सिंह -  सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा संक्रमण अत्यंत फलदायी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि यातून मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. ज्यांच्या नातेसंबंधांमध्ये काही काळापासून वाद किंवा गैरसमज होते, त्यात आता समतोल आणि सौहार्द निर्माण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घर, जमीन किंवा वाहनासंबंधी निर्णय घेतल्यास फायदेशीर होऊ शकतात. आरोग्यातही सुधारणा दिसून येईल.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
फक्त काही तास शिल्लक! या 3 राशींना संध्याकाळी मिळणार गुड न्यूज, सूर्याचं नक्षत्र परिवर्तन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल