Shanidev: अडचणी येतील सावध राहा..! शनिची मंगळावर 'तिसरी दृष्टी'; या 5 राशींचा होऊ शकतो गेम
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Shanidev Horoscope: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या दृष्टीविषयी माहिती दिलेली आहे. ग्रह ज्या राशीतून गोचर करतो, त्यापुढच्या काही राशींवर त्याची दृष्टी पडते. शनीची साडेसाती, अडीचकी याविषयी सर्वांना माहिती आहे; पण या दोन्ही गोष्टींइतकीच शनीची दृष्टीही अशुभ मानली जाते.
advertisement
1/7

सध्या शनी कुंभ राशीत, तर मंगळ मेष राशीत गोचर करत आहे. शनीची तिसरी दृष्टी मंगळावर पडत आहे. शनी आणि मंगळ एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. त्यामुळे या दृष्टीची अशुभ फळं मिळणार आहेत. बारापैकी पाच राशींनी जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
2/7
सध्या मंगळ मेष या स्व-राशीतून गोचर करत आहे. तो 12 जुलै 2024 पर्यंत मेष राशीत असेल. मेष राशीत मंगळ असल्याने कुंभ राशीत गोचर करत असलेल्या शनीची तिसरी दृष्टी मंगळावर पडली आहे. मंगळावर शनीची दृष्टी अशुभ मानली जाते. त्यामुळे कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मकर राशीला अशुभ फळं मिळू शकतात.
advertisement
3/7
कर्क : मंगळावर शनीची तिसरी दृष्टी या राशीच्या व्यक्तींना नकारात्मक फळं देईल. व्यवसायात घट होईल. आर्थिक फटका बसू शकतो. करिअरमध्ये चढ-उतार असेल. या कालावधीत धीर धरून वाटचाल करा.
advertisement
4/7
कन्या : या राशीच्या व्यक्तींना जास्त मेहनत करावी लागेल; पण अपेक्षित फळ मिळणार नाही. तरी निराश होण्याची गरज नाही. सकारात्मक वेळेची वाट पाहा. अनावश्यक खर्च चिंता वाढवतील. ऑफिसमध्ये वादात सापडाल. त्यामुळे कमी बोलणं फायदेशीर ठरेल.
advertisement
5/7
तूळ : या कालावधीत धीर धरा. मालमत्तेशी निगडित समस्या उद्भवू शकते. त्यामुळे घरात तणाव वाढेल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
advertisement
6/7
वृश्चिक : हे 20 दिवस या राशीच्या व्यक्तींसाठी कठीण आहेत. समस्या निर्माण होतील. तुम्हाला धैर्यानं समस्यांचा सामना करावा लागेल. करिअरमध्ये निराशाजनक प्रस्ताव किंवा बातमी मिळू शकते. वादविवाद टाळा.
advertisement
7/7
मकर : या राशीच्या व्यक्तींवर कामाचा ताण वाढेल. एक एक करून कामं पूर्ण करा. खर्च वाढू शकतो. आर्थिक समस्या जाणवू शकतात. नातेसंबंध बिघडू शकतात. जोडीदाराशी वर्तन चांगलं ठेवा. कारण लहान गोष्टीवरून मोठा वाद होऊ शकतो. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shanidev: अडचणी येतील सावध राहा..! शनिची मंगळावर 'तिसरी दृष्टी'; या 5 राशींचा होऊ शकतो गेम