Astrology: त्रास खूप सोसलाय, संघर्ष मोठा केला! या 5 राशींचे आता नशीब उजळणार; मंगळ-शनिची शुभसाथ
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 12, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेष (Aries) : दिवस गडबड-गोंधळाचा संमिश्र आहे. दिवसभरातला बराचसा वेळ कुटुंबातील अडचणी ऐकण्यात जाईल. पण त्यामुळे त्यांना बरं वाटेल आणि तुमच्याविषयी आदर वाढेल. लव्ह लाईफमध्ये जोडीदाराशी वाद होऊ शकतात. तुम्हाला वादाचं निराकरण करावं लागेल अन्यथा पुढे जाऊन वाद आणखी वाढतील. कुटुंबातील कोणाची तब्येत अचानक बिघडल्याने सर्वांची धावपळ होईल.Lucky Color : Navy BlueLucky Number : 2
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आज शुक्रवारचा दिवस प्रगतीचा आहे. ज्या व्यक्ती परदेशात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना चांगली संधी मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारेल. पण तुमचा खर्च वाढेल. त्यामुळे खर्च टाळणं गरजेचं आहे अन्यथा नंतर पैशाशी संबंधित अडचणींना तोंड द्यावे लागू शकतं. आज मुलांसोबत मौजमजा कराल. त्यामुळे तुम्ही चिंतामुक्त व्हाल.Lucky Color : BlueLucky Number : 5
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : लक्ष्मी कृपेनं आजचा दिवस यश मिळवून देणारा असेल. ध्येय साध्य करण्यासाठी भरपूर कष्ट कराल. पण अपेक्षित लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे निराश व्हाल. पण ही गोष्ट टाळा. शत्रू तुम्हाला राग येण्यासाठी कटू बोलला तरी त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला या गोष्टीचा राग आला तर शत्रू त्याचा फायदा घेईल. तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळतील. वाद सोडवण्यासाठी समेट घडवून आणण्यासाठी जाऊ शकता. पण तिथं विचारपूर्वक बोला.Lucky Color : Dark GreenLucky Number : 12
advertisement
4/12
कर्क (Cancer) : तसा शुक्रवारचा दिवस धकाधकीचा आहे. व्यावसायिक सौदे निश्चित करण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. कामात असताना आरोग्याकडे दुर्लक्ष करून नका. आरोग्यविषयक समस्या असतील तर बुद्धिच्या जोरावर योग्य निर्णय घ्या. यामुळे व्यवसायात देखील यश मिळू शकेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. संध्याकाळचा वेळ आई-वडिलांच्या सेवेत घालवाल.Lucky Color : PinkLucky Number : 10
advertisement
5/12
सिंह (Leo) : आज शुक्रवारचा दिवस नोकरदार व्यक्तींसाठी चांगला आहे. पदोन्नती आणि पगारवाढ किंवा अनपेक्षित पैसा मिळू शकतो. ज्या व्यक्ती अविवाहित आहेत, त्यांना विवाहासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. त्यानंतर विवाहासाठी योग्य प्रस्ताव मिळतील. काही कर्ज फेडू शकाल. आसपास वादविवाद सुरू असेल तर तुम्ही मौन बाळगणं योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका अन्यथा वाद होऊ शकतात. सतर्क राहून काम करा.Lucky Color : BrownLucky Number : 7
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज शुक्रवारी उत्पन्नात चांगली वाढ होईल. व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. या संधीचा पुरेपूर फायदा घ्याल. सट्ट्यात पैसे गुंतवणे टाळा अन्यथा पैसे बुडू शकतात. व्यावसायिकांना कामं पूर्ण करण्यासाठी कामगारांच्या काही चुकांकडे दुर्लक्ष करावे लागेल. शासकीय नोकरी करणाऱ्यांनी मैत्रिणींपासून सावध राहावे. मुलांकडून एखादी चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकेल.Lucky Color : Sky BlueLucky Number : 8
advertisement
7/12
तूळ (Libra) : आज कामात साहसी वृत्ती वाढेल. एकामागून एक चांगल्या बातम्या समजतील. कधीपासूनची नवीन वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. तुमची प्रगती पाहून तुमच्या शत्रूला हेवा वाटेल. पण तुम्हाला त्यांच्यापासून सावध रहावं लागेल. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये सतर्क राहून काम करावं लागेल. थोडं दुर्लक्ष झालं तरी काम चुकू शकते. तुमच्या चेहऱ्यावर उत्साह असेल. कुटुंबात शुभ कार्याचे आयोजन होईल.Lucky Color : GreenLucky Number : 9
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : शुक्रवारचा दिवस आपल्यासाठी समस्या वाढवणारा असेल. रागाच्या भरात चूक करू नका एखादं काम बिघडू शकता. ज्या व्यक्ती घर, दुकान किंवा प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना त्यात यश मिळेल. पण त्यांना त्यांच्या पालकांमुळे त्रास होईल. पैशाचा व्यवहार करताना काळजी घ्या, नंतर अडचणी वाढतील. सासरच्या व्यक्तींशी वाद होऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला तुमचं बोलणं संतुलित ठेवावं लागेल. धर्मादाय कामासाठी काही पैसे खर्च कराल.Lucky Color : YellowLucky Number : 6
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आज शुक्रवारचा दिवस ठीक आहे. कौटुंबिक व्यवसायात अडचणी येत असतील अनुभी व्यक्तीचा सल्ला घ्या. ज्या व्यक्तींना नोकरीसह अर्ध वेळ इतर काम करायचे आहे, त्यांना ते शक्य होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल, तरच ते परीक्षेत यशस्वी होतील. तिथे आपणास प्रभावशाली लोक भेटतील.Lucky Color : RedLucky Number : 3
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज शुक्रवारचा दिवस खर्च वाढवणारा असेल. सतत वाढत्या खर्चामुळे तुम्ही चिंतेत रहाल. त्यासाठी काटेकोर नियोजन करणं गरजेचं आहे. तुम्ही कायदेशीर कामासाठी कोणकडे मदत मागू शकता. त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकेल. तुमच्या मुलाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी आज अर्ज करू शकता. कौटुंबिक वाद झाले असल्यास संध्याकाळी नातेवाईकांमध्ये समेट घडवून आणाल. आईकडे एखादी महत्त्वाती गोष्ट विनासंकोच व्यक्त कराल. मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर सावधगिरीनं पावलं उचला.Lucky Color : BlackLucky Number : 11
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : लक्ष्मीची कृपा असेल, आर्थिक दृष्टीकोनातून शुक्रवारचा दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती सुधारू लागेल. पैशाचा व्यवहार सतर्कपणे करा अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. व्यावसायिकांनी कोणताही करार अंतिम केला तर तो लिखित स्वरुपात करा अन्यथा नंतर पश्चात्ताप करावा लागेल. ज्या व्यक्ती प्रवासाचं नियोजन करत आहेत, त्यांना त्यात य़श मिळेल. कुटुंबात सुरू असलेला कलह संपवा अन्यथा नात्यात कटुता निर्माण होऊ शकते.Lucky Color : OrangeLucky Number : 1
advertisement
12/12
मीन (Pisces) : कामाचा दिवस आहे, शुक्रवारचा दिवस अत्यंत फलदायी असेल. तुम्ही मौजमजा करण्याच्या मूडमध्ये असाल. त्यामुळे कामात अजिबात रस वाटणार नाही. नोकरदार व्यक्ती दुसरी नोकरी शोधत असतील तर त्यांना चांगली ऑफर मिळू शकते. जबाबदाऱ्या लक्षात घेत पुढे वाटचाल करा. राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तींना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. त्यांनी ती जबाबदारीनं पूर्ण करावी लागतील. जमिनीशी संबंधित कायदेशीर वाद मिटेल. तुम्हाला बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल.Lucky Color : WhiteLucky Number : 13
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: त्रास खूप सोसलाय, संघर्ष मोठा केला! या 5 राशींचे आता नशीब उजळणार; मंगळ-शनिची शुभसाथ