Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; मोठी चिंता लागलेली पण आता..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: या आठवड्यातील ग्रहांची स्थिती राशीचक्रासाठी उत्तम आहे. बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य हे चारही ग्रह मकर राशीत असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. यासोबतच बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य योग, बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग, मंगळ आणि सूर्य यांच्या युतीमुळे मंगळ आदित्य राजयोग, तसेच शुक्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे शुक्रादित्य योग निर्माण होत आहे. सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ पाहुया.
advertisement
1/4

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चढ-उतारांचा राहील. शनीचा धैय आणि केतूचा प्रभाव असल्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. झोप, आरोग्य आणि मनःशांतीकडे विशेष लक्ष द्या. मात्र मुलांशी संबंधित विषय आणि व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती चांगली राहील. संयम ठेवणे या आठवड्यात खूप महत्त्वाचे आहे.
advertisement
2/4
कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरच्या संधी हळूहळू सुधारत जातील. गुरूचा सकारात्मक प्रभाव असल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल. 12 जानेवारीनंतर निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षण, परीक्षा, मुलाखती आणि भविष्यासंबंधी नियोजनासाठी हा काळ अनुकूल आहे. मेहनत केल्यास यश नक्की मिळेल.
advertisement
3/4
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा बदलाचा आणि संक्रमणाचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला थोडी अस्वस्थता आणि गोंधळ जाणवू शकतो. मात्र 15 ते 18 जानेवारीदरम्यान परिस्थिती सुधारेल. घर, वाहन, जमीन किंवा सुखसोयींशी संबंधित निर्णय घेण्यासाठी हा काळ योग्य ठरू शकतो. कुटुंबात आनंद वाढेल.
advertisement
4/4
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा अस्थिर राहू शकतो. राहू-केतूच्या प्रभावामुळे संभ्रम आणि निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई टाळा. ध्यान, योग आणि संयम यांचा आधार घेतल्यास मानसिक शांती मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; मोठी चिंता लागलेली पण आता..