TRENDING:

किती दिवस रिक्षा-टॅक्सीने पैसे खर्च करत फिरणार? 55 हजारांमध्ये घरी आणा 80 किमी 'मायलेज किंग' Bike

Last Updated:
ईव्ही गाड्यांची चार्जिंगची समस्या असल्यामुळे कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईकला लोक पसंती देतात. त्यामुळे 100cc ते 125cc सेगमेंटच्या बाईक्स सर्वाधिक विक्री आहे.
advertisement
1/7
किती दिवस रिक्षा-टॅक्सीने फिरणार? घरी आणा 80 किमी 'मायलेज किंग' Bike
भारतात सध्या ऑटो इंडस्ट्रीमध्ये स्वस्ताईची लाट आली आहे. बाईकच्याा किंमती चांगल्याच कमी झाल्या आहे. त्यामुळे उत्तम मायलेज असणाऱ्या बाईकची विक्री झपाट्याने वाढली आहे. इंधनाच्या दरात झालेली वाढ आणि ईव्ही गाड्यांची चार्जिंगची समस्या असल्यामुळे कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईकला लोक पसंती देतात. त्यामुळे 100cc ते 125cc सेगमेंटच्या बाईक्स सर्वाधिक विक्री आहे.  खास करून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मायलेज देणाऱ्या बाईकची खास मागणी आहे. ५ अशा बाईक आहे, ज्या डोळे झाकून खरेदी करू शकतात.
advertisement
2/7
1 -TVS Sport: पहिली बाईक येते ते टीव्हीएस मोटर्सची TVS Sport ही एक मायलेज किंग बाईक आहे. रोजच्या प्रवाासाठी सगळ्या बेस्ट बाईक आहे. विशेष म्हणजे, या बाईकची किंमत फक्त  55,500 रुपयांपासून सुरू होते. या बाईकमध्ये 109.7cc चा ड्यूरा-लाइफ इंजिन आहे, जे 8.19 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क देते. ही बाईक 75 ते 80 किमी प्रति लिटर मायलेज देते.
advertisement
3/7
शहरातील वापरामध्येही ही बाईक सहज 70+ मायलेज देते. कमी देखभाल खर्च आणि वजनाने हलकी असल्यामुळे शहरात चालवण्यासाठी ही एक सोपी बाईक आहे. यामध्ये ईको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन (ET-Fi) फिचर्स दिलं आहे. ज्यामुळे पेट्रोलचा वापर कमी होतो.
advertisement
4/7
2. Bajaj Platina 110: बजाज मोटर्सची बाईक नेहमी मायलेज किंग म्हणून पहिली पसंतीची बाईक आहे.  बजाजची प्लेटिना ही एक उत्तम रायडिंग आणि चांगल्या मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. प्लेटिना 110 मध्ये मायलेजसोबतच सेफ्टीचाही विचार केला आहे. ही बाईक 69,832 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
5/7
या बाईकमध्ये 115.45cc इंजिन आहे, जे 8.6 PS पॉवर देते आणि विशेष म्हणजे, १२५ सीसी बाईक सारखं 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. प्लेटिना 110 सुमारे 70 ते 75 किमी प्रति लिटर मायलेज देते. या सेगमेंटमध्ये ABS असलेली ही एकमेव बाईक आहे. तसंच, 'नाइट्रॉक्स' सस्पेंशनमुळे खराब रस्त्यांवर सुद्धा ही बाईक कमी झटके लागतात.
advertisement
6/7
3. Hero Splendor Plus XTEC: हिरो मोटर्सची लेंजड  स्प्लेंडर बाईक गेल्या अनेक दशकापासून राज्य करत आहे. आता नवीन  Splendor Plus XTEC व्हर्जनमुळे आणखी स्मार्ट झाली आहे. ही बाईक 78,428 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
7/7
Splendor Plus मध्ये 97.2cc एअर-कूल्ड इंजिन आहे,  दे दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते. स्प्लेंडर प्लस XTEC ही 70 ते 73 किमी इतकं मायलेज देते.  Hero ची i3S तंत्रज्ञान (Idle Stop-Start System) आहे, जी ट्रॅफिक सिग्नलवर इंजिन आपोआप बंद करते आणि क्लच दाबताच सुरू होते, त्यामुळे इंधनाची बचत होते. यात डिजिटल कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि कॉल/एसएमएस अलर्टसारखे फिचर्स दिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
किती दिवस रिक्षा-टॅक्सीने पैसे खर्च करत फिरणार? 55 हजारांमध्ये घरी आणा 80 किमी 'मायलेज किंग' Bike
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल