TRENDING:

Scooter: बायको आणि लेकीसाठी घ्याच! दिवाळीत घरी आणा सगळ्यात स्वस्त Scooter, मायलेजदार 5 स्कुटर

Last Updated:
िवाळीच्या तोंडावर सर्वच कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफर दिल्या आहे. अशातच स्कुटर सेगमेंटमध्येही स्वस्ताई आली आहे. जर दिवाळीच्या तोंडावर तुम्ही एखादी स्कुटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर स्वस्त अशा स्कुटर आहे ज्या तुम्ही घरातील प्रत्येकासाठी वापरू शकता. 
advertisement
1/7
बायको आणि लेकीसाठी घ्याच! दिवाळीत घरी आणा स्वस्त Scooter,5 स्कुटरची यादी
जीएसटीच्या दरात कपात आणि दिवाळीचा सण असल्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये दुचाकी आणि चारचाकी विकत घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. दिवाळीच्या तोंडावर सर्वच कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफर दिल्या आहे. अशातच स्कुटर सेगमेंटमध्येही स्वस्ताई आली आहे. जर दिवाळीच्या तोंडावर तुम्ही एखादी स्कुटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर स्वस्त अशा स्कुटर आहे ज्या तुम्ही घरातील प्रत्येकासाठी वापरू शकता.
advertisement
2/7
TVS Jupiter -  पहिल्या क्रमांकावर आली आहे TVS मोटर्सची TVS Jupiter. या स्कुटरची किंमत ७२,४०० पासून सुरू होते. ही एक सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कुटरपैकी एक आहे. उत्तम मायलेज आणि दमदार फिचर्समुळे TVS Jupiter सगळ्यांची फेव्हरेट आहे.  ज्युपिटर १२५ मध्ये पूर्णपणे १२-इंच अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, फ्रंट डिस्क ब्रेक आणि रिअर ड्रम ब्रेक दिले आहे. TVS Jupiter मध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट आहे.  TVS ज्युपिटर १२५ मध्ये  १२५ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे ८ बीएचपी आणि १०.५ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. अलिकडेच जोडलेल्या आयगो असिस्टमुळे हे आउटपुट ८.४४ बीएचपी आणि ११.१ एनएम पर्यंत वाढते. हे इंजिन CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेला आहे.
advertisement
3/7
Honda Activa 6G - होंडा मोटर्सची   Honda Activa 6G ही एक लोकप्रिय स्कुटर आहे. या स्कुटरची किंमत ७४,३६९ रुपयांपासून सुरू होते. या स्कुटरमध्ये  विश्वासार्ह इंजिन, i3S तंत्रज्ञान दिलं आहे.  honda activa 6G ही एक्टिवा सीरिजमध्ये सगळ्यात बेस्ट अशी मानली जाते. या स्कुटरमध्ये 109.51 सीसी 4-स्ट्रोक इंजिन आहे. SI इंजिन (BS6 2.0 कंप्लायंट)सह असून 8000 rpm वर 7.99 PS ची पॉवर जनरेट करते. 5500 rpm वर 9.05 Nm इतका टॉर्क जनरेट करते. या मायलेज जवळपास 59.5 kmpl आहे. honda activa 6G या स्कुटरमध्ये  5.3 लिटर इतका फ्युल टँक, टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि 3-स्टेप एडजस्टेबल रिअर सस्पेंशन, कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) सह ड्रम ब्रेक, ट्यूबलेस टायर दिले आहे.
advertisement
4/7
Suzuki Access 125 - सुझुकी मोटर्सची Suzuki Access 125 ही एक लोकप्रिय स्कुटर आहे. या स्कुटरची किंमत ७७,२८४ हजारांपासून सुरू होते. या स्कुटरमध्ये १२५ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनसाठी बेस्ट आहे. हे इंजिन ६,५०० आरपीएम वर ८.३ बीएचपी पॉवर आणि ५,००० आरपीएम वर १०.२ एनएम पीक टॉर्क निर्माण करतं. पर्ल मॅट अ‍ॅक्वा सिल्व्हर रंगाच्या समावेशामुळे स्कूटरचे रंग पर्याय पाच पर्यंत वाढला आहे. ज्यामध्ये मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर २, मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू, पर्ल ग्रेस व्हाइट आणि सॉलिड आइस ग्रीन यांचा समावेश आहे. ही स्कुटर ४५ ते ५२ किमी मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
5/7
TVS Zest 110 - टीव्हीएस मोटर्सची आणखी एक स्कुटर आहे ती स्वस्त आणि मस्त आहे.  TVS Zest 110 ची किंमत ७०,६०० हजारांपासून सुरू होते. या स्कुटरमध्ये 109.7 cc, 4-स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन दिलं आहे जे पॉवर 7.71 bhp @ 7500 rpm आणि टॉर्क 8.8 Nm @ 5500 rpm चा जनरेट करतो. या स्कुटरचं वजन  103 किलो इतकं आहे. या स्कुटरमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी USB चार्जिंग पोर्ट दिलं आहे. तसंच  LED टेल लॅम्प, सेंटर स्टँड, DRL लाईट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिलं आहे.
advertisement
6/7
Honda Dio - होंडाची आणखी एक स्कुटर स्वस्त आणि मस्त आहे.  Honda Dio ही नव्याने लाँच केली आहे. या स्कुटरची किंमत ६८,८४६ हजारांपासून सुरू होते.   Dio चं हे अपडेटेड व्हर्जन आहे. Honda Dio चे २ व्हेरिएंट DLX आणि H-Smart विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2025 होंडा डियो आता नवी 4.2-इंच TFT इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह आहे. यात मायलेज इंडिकेटर, ट्रिप मीटर, इको इंडिकेटर आणि रेंज पाहता येईल. या स्कुटरमध्ये आइडलिंग स्टार्ट/स्टॉप सिस्टम सुद्धा दिली आहे. ज्यामुळे इंधनाची कपात आणि उत्सर्जन कमी करण्यास मदत करते.
advertisement
7/7
Hero Pleasure Plus - हिरो मोटर्सची Hero Pleasure Plus ही एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. या स्कुटरची किंमत  ६९,७६६ रुपयांपासून सुरू होते.  या स्कुटरचं इंजिन 110.9 cc, एअर कूल्ड, 4-स्ट्रोक इंजिन दिलं आहे. जे  पॉवर 8 PS सुमारे 8.15 bhp वर 7000 rpm आणि टॉर्क  8.7 Nm जनरेट करतो. या  स्कुटरचं वजन  104 - 106 kg इतकं आहे. ही एक वजनाने हलकी स्कुटर आहे. ही स्कुटर  सुमारे 50 kmpl मायलेज देण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Scooter: बायको आणि लेकीसाठी घ्याच! दिवाळीत घरी आणा सगळ्यात स्वस्त Scooter, मायलेजदार 5 स्कुटर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल