TRENDING:

जुन्या FASTag मध्येच अपडेट होईल नवा पास! आहेत फक्त या अटी, तुम्ही करु शकता का?

Last Updated:
सरकार खाजगी वाहनांसाठी वार्षिक पास सुरू करणार आहे. जो FASTag प्रणालीवर आधारित असेल. हा पास 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल आणि याअंतर्गत, वाहन मालकांना दरवर्षी 3,000 रुपये खर्च करून महामार्गावर आरामात आणि स्वस्तात प्रवास करता येईल.
advertisement
1/8
जुन्या FASTag मध्येच अपडेट होईल नवा पास! आहेत फक्त या अटी, तुम्ही करु शकता का?
भारत सरकार 15 ऑगस्ट 2025 पासून एक नवीन योजना सुरू करणार आहे. ज्याअंतर्गत खाजगी वाहन मालकांना टोल पेमेंटमध्ये मोठी सवलत मिळेल. या नवीन FASTag आधारित वार्षिक पासद्वारे, कार, जीप आणि व्हॅन सारख्या पर्सनल वाहनांचे मालक फक्त 3000 रुपयांमध्ये एक वर्ष किंवा जास्तीत जास्त 200 वेळा प्रवास करू शकतील.
advertisement
2/8
हा पास फक्त पर्सनल वापरासाठी असलेल्या वाहनांसाठी वैध असेल. जड वाहने त्याअंतर्गत येणार नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही जुन्या FASTag मध्येच नवीन FASTag अपडेट करू शकता. चला या विषयी स्टेप-बाय-स्पेट माहिती जाणून घेऊया.
advertisement
3/8
लोकांना ही सुविधा मिळेल : सरकारचा उद्देश असा आहे की, जे लोक दररोज किंवा नियमितपणे महामार्गावरून प्रवास करतात त्यांना वारंवार टोल शुल्क भरावे लागू नये आणि त्यांचा प्रवास सोयीस्कर आणि स्वस्त होऊ शकेल. या नवीन सुविधेमुळे राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होईल. टोल प्लाझावरील अडथळे कमी होतील आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. नितीन गडकरी यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, ते राजमार्ग यात्रा अ‍ॅप तसेच एनएचएआय आणि एमओआरटीएचच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाईल.
advertisement
4/8
तुमच्या विद्यमान फास्टॅग खात्यात वार्षिक पास कसा अॅक्टिव्ह करायचा? : तुमच्या विद्यमान फास्टॅगवर वार्षिक पास अॅक्टिव्ह केला जाऊ शकतो. परंतु तो पात्रता पूर्ण करणारा आणि तो कारच्या विंडशील्डवर योग्यरित्या चिकटलेला आणि वैध नोंदणी क्रमांकाशी जोडलेला असावा. तसंच ब्लॅकलिस्टेड नंबर नसावा. तरच तुम्ही तुमच्या विद्यमान फास्टॅग खात्यात वार्षिक पास अॅक्टिव्ह करू शकाल.
advertisement
5/8
तुम्ही फास्टॅग वार्षिक पास कुठून खरेदी करू शकता? : फास्टॅग वार्षिक पास फक्त Rajmarg Yatra App आणि एनएचएआय वेबसाइटवर घेता येतो.
advertisement
6/8
फास्टॅग वार्षिक पास किती काळासाठी वैध असतो? : FASTag वार्षिक पास अॅक्टिव्ह झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा 200 प्रवासांसाठी, जे आधी असेल त्याकरिता वैध आहे. एकदा FASTag वार्षिक पास 200 प्रवास पूर्ण करतो किंवा अॅक्टिव्ह झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण करतो, की तो आपोआप नियमित FASTag मध्ये रूपांतरित होतो. वार्षिक पासचे फायदे मिळवत राहण्यासाठी, तुम्हाला 200 प्रवासांसाठी किंवा 1 वर्षासाठी तुमचा वार्षिक पास पुन्हा अॅक्टिव्ह करावा लागेल.
advertisement
7/8
अॅन्युअल पास कसा अॅक्टिव्हेट होईल? : वाहनाची पात्रता आणि त्याच्याशी जोडलेला FASTag पुष्टी केल्यानंतर वार्षिक पास अॅक्टिव्ह केला जाईल. यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाइल अॅप्लिकेशन किंवा NHAI वेबसाइटद्वारे 2025-26 साठी 3,000 रुपये भरावे लागतील. पेमेंट झाल्यानंतर, वार्षिक पास FASTag वर अॅक्टिव्ह केला जाईल.
advertisement
8/8
तुम्हाला वार्षिक पासची माहिती कशी मिळेल? : तुम्हाला तुमच्या फोनवर वार्षिक पासची माहिती आरामात मिळत राहील. तुम्हाला एसएमएस अलर्टद्वारे माहिती मिळत राहील. यासाठी, तुमचा मोबाइल नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे ज्यावर वार्षिक पास नोंदणीकृत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
जुन्या FASTag मध्येच अपडेट होईल नवा पास! आहेत फक्त या अटी, तुम्ही करु शकता का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल