TRENDING:

टीम इंडियासाठी अंडर-19 चे 6 खेळाडू तयार... WTC फायनलला पोहोचण्यासाठी आताच संघात घ्या!

Last Updated:
टीम इंडिया जगातल्या सर्वोत्तम क्रिकेट टीमपैकी एक आहे. अंडर-19 क्रिकेटमधले काही खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत, ज्यामुळे ते आताच इंडियाच्या सीनियर टीमकडून खेळण्यासाठी सज्ज आहेत.
advertisement
1/6
टीम इंडियासाठी अंडर-19 चे 6 खेळाडू तयार... WTC फायनलला पोहोचण्यासाठी संघात घ्या!
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक बॅटिंगने आयपीएलमध्ये खळबळ उडवून दिली आणि अलीकडेच रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये युएईविरुद्ध 144 रनची वादळी खेळी केली. याआधी आयपीएलमध्येही त्याने शतक ठोकलं होतं. टीम इंडियाकडून खेळण्यासाठी वैभव सूर्यवंशी तयार आहे.
advertisement
2/6
आयुष म्हात्रे हा भारताच्या अंडर-19 टीमचा सध्याचा कर्णधार आहे. तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे, आयुष म्हात्रेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भाविरुद्ध मुंबईसाठी धमाकेदार शतक झळकावले आहे, याचसोबत त्यानेही टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहेत.
advertisement
3/6
वेदांत त्रिवेदी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि भारतीय अंडर-19 टीमसाठी सातत्याने कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युवा एकदिवसीय मालिकेत त्याने तीन सामन्यात 86.18 च्या सरासरीने 173 रन केल्या. वेदांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी चमत्कार करू शकतो.
advertisement
4/6
विहान मल्होत्रा हा भारतीय अंडर-19 टीमचा उपकर्णधार आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 48.60 च्या सरासरीने 243 रन केल्या. विहानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये 119 रन केल्या.
advertisement
5/6
19 वर्षीय युवा स्पिन बॉलर कनिष्क चौहान टीम इंडियासाठी पूर्णपणे तयार दिसतो. इंग्लंडविरुद्धच्या युवा एकदिवसीय मालिकेत त्याने 5 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या, तसंच त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्स मिळाल्या.
advertisement
6/6
भारतीय अंडर-19 टीमचा विकेट कीपर बॅटर अभिज्ञान कुंडूने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यात 112 रन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यात 173 रन केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
टीम इंडियासाठी अंडर-19 चे 6 खेळाडू तयार... WTC फायनलला पोहोचण्यासाठी आताच संघात घ्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल