TRENDING:

Tesla आता येईल तुमच्या दारात, इतकं डाउनपेमेंट केल्यावर इतका येईल EMI

Last Updated:
मुंबईमध्ये टेस्लाचं शोरूम सुरू झालं आहे. पण टेस्लाच्या कारच्या किंमतीची सगळ्या जास्त चर्चा होत आहे. पण आता टेस्ला घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
advertisement
1/7
Tesla आता येईल तुमच्या दारात, इतकं डाउनपेमेंट केल्यावर इतका येईल EMI
जगप्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांची टेस्ला अखेर भारतात लाँच झाली आहे. मुंबईमध्ये टेस्लाचं शोरूम सुरू झालं आहे. पण टेस्लाच्या कारच्या किंमतीची सगळ्या जास्त चर्चा होत आहे. कारण, २७ ते ३६ लाखांची कार ही ७० लाखांपर्यंत येत आहे. पण आता टेस्ला घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण, कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड (KMPL) ही भारतातील टेस्लाची पहिली फायनान्सर ठरली आहे. या भागीदारीअंतर्गत, ग्राहकांना टेस्लाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठी खास डिझाइन केलेल्या कर्जाचा पर्याय मिळणार आहे.
advertisement
2/7
२४ राज्ये, १६१ शाखा - कोटक महिंद्रा बँकेची उपकंपनी KMPL १९९६ पासून भारताच्या कार फायनान्स मार्केटमध्ये एक प्रमुख आहे. कंपनीने २०१८ मध्ये दुचाकी कर्ज देण्यास सुरुवात केली आणि २०२२ मध्ये कंपनीने मालमत्तेच्या सुविधेवर कर्ज देण्यास सुरुवात केली. सध्या, बँकेच्या भारतातील २४ राज्यांमध्ये १६१ शाखा आहेत आणि केएमपीएल अनेक ऑटोमोबाईल ब्रँडशी फायनान्सर म्हणून संबंधित आहे.
advertisement
3/7
युझड कारवर देखील KMPL नवीन आणि वापरलेल्या कार आणि दुचाकींसाठी कर्ज देतेय. तसंच कोटक महिंद्रा द्वारे ऑटो डीलर्सना घाऊक वित्त पर्याय देखील देते. याशिवाय, निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेसाठी कर्ज सेवा देखील दिल्या जातात.
advertisement
4/7
टेस्लासाठी मासिक EMI आणि डाउनपेमेंट - टेस्लाचे मिड-रेंज बेस मॉडेल सध्या 61.07 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे (ऑन-रोड, मुंबई). जर तुम्ही ते EMI वर खरेदी करायचे ठरवले तर तुमचा मासिक EMI सुमारे 85,259 रुपये असेल
advertisement
5/7
डाउनपेमेंट - समजा जर तुम्ही ७० लाख रुपये किंमतीच्या टेस्ला कारच्या Y मॉडेल घेण्याचा प्लॅन केला तर त्यासाठी 20 लाख रुपये डाउन पेमेंट करू शकतात. 5 वर्षांचा कर्ज कालावधी आणि 9% व्याजदर गृहीत धरलं तर १०३७९१ इतका हफ्ता येईल. आणि व्याज हे १२२७५०६ रुपये इतकं व्याज जाईल. तुम्ही टेस्लाच्या वेबसाइटवर तुमचे कर्ज देखील कस्टमाइझ करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार EMI योजना निवडू शकता.
advertisement
6/7
बॅटरी आणि रेंज - Tesla Model Y मध्ये २ ऑप्शन दिले आहे. यामध्ये एक 60 kWh आणि दुसरा 75 kWh बॅटरी पॅक दिला आहे. यामध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी जवळपास 295hp इतकी पॉवर जनरेट करते.
advertisement
7/7
ड्राइव्हिंगच्या रेंजबद्दल बोलायचं झालं तर 60 kWh बॅटरी पॅक एकदा फुल चार्ज झाली तर 500 किलोमीटर इतकी रेंज मिळेल. तर 75 kWh बॅटरी पॅक फुल चार्ज केल्यावर 622 किलोमीटर इतकी रेंज मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tesla आता येईल तुमच्या दारात, इतकं डाउनपेमेंट केल्यावर इतका येईल EMI
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल