TRENDING:

तब्बल 180 फुटांचा ट्रक; कशासाठी होतो वापर तुम्हाला माहितीये का? पाहा PHOTOS

Last Updated:
ट्रक महाकाय असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना अनेक अडचणी येतात.
advertisement
1/5
तब्बल 180 फुटांचा ट्रक; कशासाठी होतो वापर तुम्हाला माहितीये का? पाहा PHOTOS
तुम्ही एखाद्या महामार्गावरून जाताना माल वाहतूनक करणारे मोठमोठाले ट्रक पाहिले असतील. पण कधी तब्बल 180 फूट लांबीचा ट्रक पाहिलाय का ? तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल एवढ्या लांबीचा ट्रक कशासाठी असतो? या ट्रकचा स्पीड आणि ऍव्हरेज मायलेजबद्दल जाणून घ्यायलाही आपल्याला नक्कीच आवडेल. कर्नाटकातून पवनचक्कीची पाती घेऊन मध्यप्रदेशकडे जाताना हे ट्रक धाराशिवमध्ये आले आहेत. याबाबतच आपण माहिती घेणार आहोत.
advertisement
2/5
भारतातील कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे पवनचक्कीचे पाते बनवण्याची कंपनी आहे. या कंपनीत बनवलेली पवनचक्कीची पाती ही वाहून नेण्यासाठी विशालकाय ट्रक वापरला जातो. ट्रकची लांबी ही जवळपास 180 फूट इतकी आहे तर वाहून नेल्या जाणाऱ्या पवनचक्कीच्या पात्याची लांबी ही जवळपास 236 फूट इतकी आहे.
advertisement
3/5
या महाकाय ट्रकसाठी इंधनही त्याच पटीत लागते. हा 180 फूट लांबीचा ट्रक एक लिटर डिझेलमध्ये एक किलोमीटर ते 1.6 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करतो. हा ट्रक विंड ब्लेड म्हणजेच पवनचक्कीचे पाते वाहून नेण्यासाठी वापरला जातो. ट्रक महाकाय असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक कमी असताना म्हणजेच रात्रीच्या वेळीच प्रवास करतो. तर ट्रकचा वेग हा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असतो, असे चालक पांडे देवल सांगतात.
advertisement
4/5
पवनचक्कीची पाती वाहून नेण्यासाठी वापरला जाणारा महाकाय ट्रक रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करतो. त्यानंतर दिवशभर रस्त्याच्या कडेला उभा केला जातो. ज्यामुळे दिवसा प्रवासासाठी अडथळा निर्माण होणार नाही. तसेच या ट्रक सोबत एक एस्कॉर्ट पथक देखील असते. ट्रक ड्रायव्हर सोबत चार व्यक्ती सहायतेसाठी असतात. सकाळी सहा वाजता जिथे ट्रक उभा राहतो तिथेच गाडीतील सर्वजण जेवण बनवतात. आराम करतात आणि रात्री दहा नंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात करतात, असेही चालक सांगतात.
advertisement
5/5
बेंगलोर ते मध्य प्रदेशातील धार इथपर्यंतचा प्रवास करण्यासाठी त्यांना 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. एकूणच 180 फूट लांबीचा महाकाय ट्रक चालवताना ट्रक ड्रायव्हर, सहाय्यक आणि एस्कॉर्ट पथक यांना तारेवरची कसरत करावी लागते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
तब्बल 180 फुटांचा ट्रक; कशासाठी होतो वापर तुम्हाला माहितीये का? पाहा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल