TRENDING:

HSRP संबंधीत सरकारचा मोठा निर्णय; नंबरप्लेट बसवली नसेल तर काळजी करू नका

Last Updated:
महायुती सरकारने तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. पहिली अंतिम तारीख एप्रिल, त्यानंतर जून आणि तिसऱ्यांदा 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
advertisement
1/7
HSRP संबंधीत सरकारचा मोठा निर्णय; नंबरप्लेट बसवली नसेल तर काळजी करू नका
वाहन मालकांसाठी Good News, सरकारकडून HSRP बसवण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे 2019 पूर्वीच्या वाहन मालकांना HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी आता जास्तीचा वेळ मिळाला आहे. आधी HSRP नंबर प्लेट लावण्याची तारीख 15 ऑगस्ट होती. पण आता ही तारीख वाढवली गेली आहे.
advertisement
2/7
HSRP म्हणजे काय?HSRP (High Security Registration Plate) म्हणजे चोरी रोखण्यासाठी, नंबर प्लेट बनावट होऊ नये म्हणून खास सुरक्षा तंत्रज्ञानासह बनवलेली नोंदणी प्लेट आहे. यात क्रोमियम बेस्ड होलोग्राम, लेझर एन्ग्रेव्ह केलेला नंबर आणि पिन-लॉकिंग सिस्टीम असते.
advertisement
3/7
कोणत्या वाहनांना आवश्यक?1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. याआधी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत होती, आता ती 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
4/7
मुदतवाढ का दिली?वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे सरकारने ही मुदत वाढवली. सरकारकडे असलेल्या डेटानुसार आतापर्यंत फक्त 20% वाहनांवर HSRP बसवली आहे, तर 10% वाहनधारकांनी अपॉइंटमेंट घेतली आहे. अजूनही 70% जुन्या वाहनांवर HSRP बसवायची बाकी आहे.
advertisement
5/7
त्यामुळे आता सरकारने ही मुदत वाढ आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत केली आहे. आधी ही तारीख 15 ऑगस्ट होती. त्यामुळे आता वाहन मालकांना 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी मिळाला आहे.
advertisement
6/7
1 डिसेंबर 2025 नंतर जर HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर वायुवेग पथकाकडून नियमांनुसार कारवाई केली जाईल असं देखील सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, 30 नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट जर घेतली असेल आणि अपॉइंटमेंट उशीराची मिळाली असेल तर अशा परिस्थीतीत कारवाई होणार नाही.
advertisement
7/7
सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी आवाहन केले आहे की, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनधारकांनी वेळेत HSRP नंबर प्लेट बसवावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
HSRP संबंधीत सरकारचा मोठा निर्णय; नंबरप्लेट बसवली नसेल तर काळजी करू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल