TRENDING:

HSRP नंबरप्लेटची डेडलाइन 7 दिवसांवर! बसवली नाही? एक काम केल्यास होणार नाही कारवाई

Last Updated:
HSRP Number Plate : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ही 15 ऑगस्ट आहे. या तारखेनंतर जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवलेली नसेल तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.
advertisement
1/6
HSRP नंबरप्लेटची डेडलाइन 7 दिवसांवर!  'हे' काम केल्यास होणार नाही कारवाई
मुंबई : महाराष्ट्र परिवहन विभागाने पुन्हा एकदा हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत वाढवली होती. जी 15 ऑगस्ट 2025 पर्यत होती. आता अंतिम मुदत संपायला फक्त 7 दिवस बाकी आहेत. ज्यामुळे ज्या लोकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नाही त्यांना घाई करावी लागणार आहे.
advertisement
2/6
मात्र पुढील सात दिवसांतही तुम्ही हाय सिक्योरिटी नंबर प्लेट बसवू शकला नाहीत तर कारवाईपासून बचाव करण्यासाठी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट करुन घ्यायला हवी.
advertisement
3/6
राज्य परिवहन विभागाने वाहनांवर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट बसवणं ही अनिवार्य केली आहे. मात्र सात महिने होऊनही अद्याप फक्त 3 लाख 55 हजार वाहनांवरच एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. अजुनही 18 लाख 79 हजार 921 वाहनांना नंबर प्लेट बसवणं बाकी आहे. मात्र उर्वरीत 7 दिवसांत एवढ्या नंबर प्लेट बसवणं शक्य आहे का? असा प्रश्नही उद्भवतो.
advertisement
4/6
7 दिवसांनंतर नंबर प्लेट बसवता आली नाही तर त्या वाहनांवर कारवाई केली जाईल असा इशाराही आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आला आहे. पण कारवाईमधून वाचायचे असेल तर तुम्ही एक काम करु शकता.
advertisement
5/6
सरकार मुदतवाढ देते याच कारणामुळे अनेक लोक ही एचएसआरपी नंबर प्लेट बसवत नाहीयेत. पण जर मुदतवाढ दिली नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारवाईच्या बडग्यापासून स्वतःला वाचवायचे असेल तर सात दिवसांत किमान तुमच्या एचएसआरपी नंबर प्लेटची नोंदणी करुन ठेवा.
advertisement
6/6
तुम्हाला लगेच नंबर प्लेट लावून मिळणार नसली तरीही तुम्ही नोंदणी केलेली असेल तरीही तुम्ही कारवाईपासून वाचू शकता. नंबर प्लेट बसवूण घेण्यासाठी तुम्हाला 2 महिन्यांनंतरचा ‘स्लॉट’ मिळू शकतो. नोंदणी केलेली असेल तर तुमच्यावर कारवाई केली जाणार नसल्याचे कार्यालयाने म्हटले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
HSRP नंबरप्लेटची डेडलाइन 7 दिवसांवर! बसवली नाही? एक काम केल्यास होणार नाही कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल