Creta आता विसरा! Hyundai ने आणली हायटेक आणि स्वस्त SUV, मायलेजही 20 किमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
आता Hyundai ने आपली सगळ्यात स्वस्त अशी SUV लाँच केली आहे. Hyundai कंपनीने Hyundai Venue 2025 चं नवीन अपडेट फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं आहे
advertisement
1/10

दक्षिण कोरियन कंपनी हुंदई मोटर्स (Hyundai) ने अखेर ठरल्याप्रमाणे धमाका केला आहे. मागील अनेक वर्षांपासून Hyundai एसयूव्ही सेगमेंटमध्ये बरेच बदल केले आहे. आता Hyundai ने आपली सगळ्यात स्वस्त अशी SUV लाँच केली आहे. Hyundai कंपनीने Hyundai Venue 2025 चं नवीन अपडेट फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं आहे. Hyundai Venue 2025 ची किंमतही इतर मॉडेलच्या तुलनेत कमी आहे.
advertisement
2/10
नव्या Hyundai Venue 2025 मध्ये कनेक्टिव्हिटी, ड्रायव्हर असिस्टन्स इतर गोष्टींवर भर दिला आहे. Hyundai Venue 2025 ची बुकिंग डीलरशिप्सवर आणि कंपनीच्या साईटवर सुरू झाली आहे. 25,000 रुपयांच्या टोकन अमाऊंटवर ही नवीन Hyundai Venue 2025 बूक करता येईल.
advertisement
3/10
Hyundai Venue 2025 मध्ये बाहेरून आणि आतून बरेच बदल करण्यात आले आहे. भारतात पहिल्यांदाच Hyundai Venue 2025 ही NVIDIA द्वारे कनेक्टेड कार नॅव्हिगेशन कॉकपिट सिस्टीमसह तयार केली आहे. हे फिचर देणारी Hyundai Venue 2025 ही पहिली एसयूव्ही आहे.
advertisement
4/10
Hyundai Venue 2025 मध्ये 31.24cm चे 2 कवर्ड पॅनोरॅमिक डिस्प्ले दिले जाणार आहे, जे इन्फोटेनमेंट आणि ड्रायव्हर माहिती या दोन्हींचे काम करणार आहे.
advertisement
5/10
Hyundai Venue 2025 मध्ये वायरलेस Android Auto/Apple CarPlay ला सपोर्ट करेल तसंच ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्सची सुविधा दिली. यामध्ये कस्टमाइजेबल डिजिटल इंटरफेस आणि 5 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, बंगाली आणि तमिळ) व्हॉईस रेकग्निशन देखील आहे.
advertisement
6/10
Hyundai Venue 2025 मध्ये 400 हून अधिक व्हॉईस कमांड्सना सपोर्ट करेल. केबिनमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, व्हॉईस-इनबल्ड इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, मागील AC व्हेंट्स, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, इलेक्ट्रिक 4-वे ड्रायव्हर सीट आणि इन-बिल्ट जिओ सावन म्युझिक ॲप्सारख्या सुविधा देखील दिलं आहे.
advertisement
7/10
Hyundai Venue 2025 मध्ये सुरक्षेसाठी 16 फीचर्स दिले आहेत. यामध्ये लेव्हल-2 ADAS मिळेल. SUV मध्ये 65 हून अधिक सुरक्षा सुविधा देखील आहेत, त्यापैकी 33 मानक म्हणून उपलब्ध आहेत.
advertisement
8/10
Hyundai Venue 2025 मध्ये सहा मोनोटोन आणि दोन ड्युअल-टोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 7.89 लाख रुपये पासून सुरू होऊन 9.14 लाख रुपये पर्यंत आहे. Hyundai Venue 2025 लॉन्च झाल्याबरोबरच बुकिंग सुरू झाली आहे आणि लवकरच डिलिव्हरी देखील सुरू होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
9/10
Hyundai Venue 2025 मध्ये 1.2-लीटर MPi पेट्रोल, 1.0-लीटर टर्बो GDi पेट्रोल आणि 1.5-लीटर U2 CRDi डिझेल इंजिन पर्याय दिला आहे. Hyundai Venue 2025 ची HX2 व्हेंरियंटची किंमत 7.90 लाख रुपये आहे. तर HX4 व्हेरियंट किंमत 8.80 लाख रुपये आणि HX5 व्हेरियंटची किंमत 9.15 लाख रुपये इतकी आहे.
advertisement
10/10
मायलेजचा विचार केला तर , Hyundai Venue 2025 पेट्रोल व्हेरियंटमध्ये 18.05 किमी इतकं मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. तर टर्बो पेट्रोल व्हेरियंट हे 20 किमी प्रति लीटर मायलेज आणि डिझेल व्हेरियंटमध्ये 17 किमी ते 20.90 किमीच्या दरम्यान मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Creta आता विसरा! Hyundai ने आणली हायटेक आणि स्वस्त SUV, मायलेजही 20 किमी!