Mahindra Vision T: महिंद्राने अखेर करून दाखवलं, हायटेक 4 SUV लाँच, लूक आणि किंमत ऐकून बसेल शॉक!
- Published by:Sachin S
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने स्वातंत्र्य दिनी ‘Freedom NU’ कार्यक्रमात SUV चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. भारतीय ऑटोमोबाईल दिग्गजाने एकदम चार SUV कॉन्सेप्ट्सचे अनावरण केलं.
advertisement
1/7

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने स्वातंत्र्य दिनी ‘Freedom NU’ कार्यक्रमात SUV चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. भारतीय ऑटोमोबाईल दिग्गजाने एकदम चार SUV कॉन्सेप्ट्सचे अनावरण केलं – Vision.T, Vision.S, Vision.SXT आणि Vision.X. त्याचसोबत, कंपनीने नवा ‘NFA’ प्लॅटफॉर्मही सादर केला आहे, जो ICE (पेट्रोल/डिझेल), इलेक्ट्रिक आणि हायब्रिड – तिन्ही प्रकारच्या पॉवरट्रेनसह आणि अनेक बॉडी स्टाइल्ससह येणार आहे. या नव्या पिढीच्या SUV भविष्यात भारतातील रस्त्यांना एक वेगळाच रॉयल अंदाज देणार आहेत.
advertisement
2/7
Vision.T ही महिंद्राच्या Thar E चा अपग्रेडेड अवतार असून, ती Nu IQ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. बॉक्सी आणि मस्क्युलर डिझाइन, फ्लॅट बोनट, नवीन सिक्स-स्लॅट ग्रिल आणि स्क्वेअर हेडलाईट्स यामुळे ती रस्त्यावर एकदम 'किंग ऑफ द रोड' वाटते. ब्ल्यू-राखाडी रंगाचा रॉयल कॉम्बिनेशन तिला प्रीमियम लूक देतो. आतमध्ये मोठा उभा टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-टोन डॅशबोर्ड आणि स्टिअरिंगवरच असलेलं स्टार्ट बटण – हे सगळं तिचा दर्जा आणखी उंचावतात. ही सब-कॉम्पॅक्ट SUV जानेवारी 2028 मध्ये भारतीय बाजारात अपेक्षित आहे आणि तिची किंमत अंदाजे ₹12.50 लाख ते ₹20.00 लाख दरम्यान असू शकते.
advertisement
3/7
Vision.S ही कदाचित पुढच्या पिढीची इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड Scorpio असू शकते. उंच स्टान्स, मोठा आणि आक्रमक ग्रिल, आणि रॉयल पिवळा-करडा रंगसंगती तिला एक वेगळाच 'मजबूत पण स्टायलिश' लूक देते. फॅमिली SUV असली तरी तिच्यातला पॉवरफुल रोड प्रेझेन्स खूपच प्रभावी आहे. ही कॉम्पॅक्ट SUV जानेवारी 2027 मध्ये भारतात येण्याची शक्यता असून तिची किंमत अंदाजे ₹10.50 लाख ते ₹17.50 लाख असेल.
advertisement
4/7
Vision.X ही SUV Vision.T आणि Vision.S यांच्या मध्ये बसते, पण फॅमिली-ओरिएंटेड असल्यामुळे तिच्या डिझाइनमध्ये स्मूद लाईन्स आणि प्रीमियम फिनिश आहेत. राखाडी-करडा रंग आणि कनेक्टेड LED टेललॅम्प्स तिचं रिच आणि सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्त्व अधोरेखित करतात. आतमध्ये आरामदायी आणि लक्झरी इंटीरियरची झलक आहे. ही सब-कॉम्पॅक्ट SUV ऑगस्ट 2026 मध्ये भारतात पदार्पण करेल, ज्याची किंमत अंदाजे ₹11.00 लाख ते ₹18.00 लाख असेल.
advertisement
5/7
Vision.SXT ही महिंद्राच्या लाइनअपमधली सगळ्यात अ‍ॅडव्हेंचरस दिसणारी गाडी आहे. क्लॅमशेल बोनट, एक्स्पोज्ड हिंजेस, हेवी-ड्युटी बंपर – सगळं काही तिच्या ऑफ-रोड क्षमतेची खात्री देते. रॉयल ब्राऊन रंगामुळे ही SUV एकदम 'क्लास अपार्ट' दिसते. ही फुल-साईज SUV ऑगस्ट 2028 मध्ये भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे आणि तिची किंमत अंदाजे ₹13.50 लाख ते ₹22.00 लाख असू शकते.
advertisement
6/7
या सर्व गाड्या पुढे येणाऱ्या NFA (Next-Gen Flexible Architecture) प्लॅटफॉर्मवर आधारित असतील, जो ICE, EV आणि हायब्रिड – तिन्ही प्रकारांना सपोर्ट करतो. पुढच्या पिढीची Bolero आणि Thar Sportही यावरच तयार होणार आहेत. पुण्यातील चाकण प्लांटमध्ये दरवर्षी 1.2 लाख वाहनं बनवण्याची क्षमता या प्लॅटफॉर्मसह तयार होईल.
advertisement
7/7
महिंद्राने या चारही SUV कॉन्सेप्ट्स केवळ डिझाइनसाठीच नव्हे तर भविष्यातील भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि जीवनशैली लक्षात घेऊन तयार केल्या आहेत. इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि ICE – तिन्ही पॉवरट्रेनसह या गाड्या पर्यावरणपूरक असतानाच, दमदार परफॉर्मन्स आणि रॉयल प्रेझेन्स देणार आहेत. म्हणजेच, शहरातील स्टायलिश राईडपासून डोंगर-दऱ्यांतील ऑफ-रोड साहसापर्यंत – महिंद्राची ही नवी फौज सर्व काही पेलायला सज्ज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Mahindra Vision T: महिंद्राने अखेर करून दाखवलं, हायटेक 4 SUV लाँच, लूक आणि किंमत ऐकून बसेल शॉक!