Maruti आता पुढच्या 24 तासांमध्ये करणार मोठा धमाका, मार्केटमध्ये वारं फिरणार; गेमचेंजर SUV येतेय!
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी मोटर्स अखेरीस आता ईलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये पाऊल टाकत आहे.
advertisement
1/9

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी मोटर्स अखेरीस आता ईलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये पाऊल टाकत आहे. मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित Maruti Suzuki E Vitara आता उद्या २ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. मागील वर्षभरापासून Maruti Suzuki E Vitara बद्दल बरीच चर्चा सुरू होती, अखेरीस ही एसयूव्ही आता लोकांच्या समोर येणार आहे. या एसयूव्हीची थेट टक्कर आता टाटा मोटर्स आणि महिंद्राशी असणार आहे.
advertisement
2/9
Maruti Suzuki E Vitara ही पूर्णपणे नव्याने तयार करण्यात आलेली एसयूव्ही आहे. ई-विटारा एक मजबूत एसयूव्हीसारखी दिसतीये, या एसयूव्हीमध्ये बाहेरील डिझाईनमध्ये अनेक बदल केले आहे. समोर स्लीक Y-आकाराचे LED DRL, शार्प हेडलॅम्प दिले आहे.
advertisement
3/9
मागील आणि बाजूच्या प्रोफाइलमध्ये मोठे व्हील आर्च आणि जाड डोअर क्लॅडिंग आहे. Maruti Suzuki E Vitara मध्ये 18-इंचाचे ड्युअल-टोन अलॉय व्हील्स दिले आहेत. तर मागील आणि समोरील बाजूला मजबूत बंपर आणि रॅपअराउंड LED टेल लॅम्प आहेत, जे DRL प्रमाणे, Y-आकाराचे डिझाईन आहे.
advertisement
4/9
Maruti Suzuki E Vitara च्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर कारमध्ये नवीन डॅशबोर्ड दिला आहे, केबिनमध्ये ड्युअल-टोन थीम आहे, डॅशबोर्ड आणि सीट्स दोन्ही ड्युअल-टोन ब्लॅक आणि टॅन शेड्समध्ये फिनिश केलेलं आहे. तसंच एक नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील डिझाइन, ग्लॉस ब्लॅक इन्सर्ट, सेमी-लेदर सीट अपहोल्स्ट्री आणि ड्युअल-स्क्रीन सेटअप देखील असणार आहे.
advertisement
5/9
Maruti Suzuki E Vitara मध्ये ड्युअल-स्क्रीन सेटअप असेल, ज्यामध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.1-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले असणार आहे. यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह इन्फिनिटी साउंड सिस्टम देखील असेल.
advertisement
6/9
तसंच, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, १०-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डिंग ORVM आणि PM2.5 केबिन एअर फिल्टर यांचा समावेश आहे.
advertisement
7/9
Maruti Suzuki E Vitara च्या सुरक्षिततेबद्दल विचार केला तर, मारुती ई विटारामध्ये ७ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ३६०-डिग्री कॅमेरा दिला आहे. तसंच, युरो NCAP क्रॅश टेस्टमध्ये E विटाराला ४-स्टार सेफ्टी रेटिंग सुद्धा मिळाले होते.
advertisement
8/9
एवढंच नाहीतर Maruti Suzuki E Vitara मध्ये लेव्हल-२ ADAS सिस्टम सुद्धा असणार आहे. ज्यामध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, हाय बीम असिस्ट, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट अलर्ट आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सारखे फिचर्स आहे.
advertisement
9/9
e Vitara 2025 ची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केली नाही. पण आता उद्या २ डिसेंबरला e Vitara 2025 अधिकृतरित्या लाँच होत आहे. तरीही या एसयूव्ही किंमत ही २० लाख ते २५ लाखांच्या किंमतीदरम्यान असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti आता पुढच्या 24 तासांमध्ये करणार मोठा धमाका, मार्केटमध्ये वारं फिरणार; गेमचेंजर SUV येतेय!