TRENDING:

Pune: लोणावळ्यातल्या एका बंगल्यात आजही उभी आहे Rolls Royce कार, कुणीही तिथे जात नाही!

Last Updated:
आयशा व्हिला नावाचा या बंगल्याबद्दल अनेक अशा कथा आहे. कुणी हा व्हिला भूतबाधी असल्याचं सांगत आहे. तर काहींनी इथं वेगवेगळे आवाज ऐकले आहे.
advertisement
1/12
लोणावळ्यातल्या एका बंगल्यात आजही उभी आहे Rolls Royce कार, कुणीही तिथे जात नाही!
पुणे जिल्ह्यातील लोणावळा इथं मुंबई पुणे हायवेवर एक आयशा नावाचा बंगला आहे. या बंगल्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आणि घटना कायम चर्चेत असतात. या बंगल्यामध्ये भूत असल्याचं सांगितलं जात आहे. मागील अनेक वर्षांपासून हा बंगला कायम स्वरुपी बंद पडलेला आहे. या बंगल्याबद्दल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि पोस्ट आहे.त्यामुळे या बंगल्यात कुणाही जाण्याची हिंमत करत नाही. या बंगल्यात कायम चर्चेक असते ती बंगल्यात उभी असलेली आलिशान अशी रॉयस रॉयल्स एक.
advertisement
2/12
आयशा व्हिला नावाचा या बंगल्याबद्दल अनेक अशा कथा आहे. कुणी हा व्हिला भूतबाधी असल्याचं सांगत आहे. तर काहींनी इथं वेगवेगळे आवाज ऐकले आहे. काहींनी इथं किंचाळण्याचे आवाजही  ऐकले आहे. या बंगल्यात एक गोल्डन रंगाची रोल्स रॉयस सिल्व्हर शॅडो ही आलिशान कार उभी आहे. 
advertisement
3/12
असं सांगितलं जातं की, या ठिकाणी एक कुटुंब राहत होतं. या कुटुंबामध्ये एक १७ वर्षांची मुलगी होती जिचं नाव आयशा होतं. तिच्या नावावर हा व्हिला होता.
advertisement
4/12
या व्हिलामध्ये उभ्या असलेल्या या रोल्स रॉयस कारमध्ये आयशाचा आत्मा भटकत असतो, असं सांगितलं जात आहे.  लोकांनी या रोल्स रॉयस कारला  'हॉन्टेड रोल्स रॉयस' असं नाव दिलं आहे.
advertisement
5/12
पण, या भागात राहणाऱ्या आणि काही संशोधकांनी याचा अभ्यास केला. तर ही निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं आहे. मुळात लोणावळा आणि खंडाळा हा भाग पर्यटनस्थळ आहे. इथं लोकांची नेहमी गर्दी असते.
advertisement
6/12
डोंगराळ भाग असल्यामुळे इथं रात्रीच्यावेळी भीतीदायक असं वातावरण असतं. मुळात ही जागा विक्री होऊ नये म्हणून लँड माफियांनी आयाशा व्हिलामध्ये भूत असल्याची अफवा पेरली असावी, असं लोकांचं म्हणणं आहे.   
advertisement
7/12
रोल्स रॉयस कारबद्दल लोक वेगवेगळी चर्चा करतात. ही कार ब्रिटिश काळातील (स्वातंत्र्यापूर्वीची असल्याचं सांगितलं जा आहे. पण, हा दावा साफ चुकीचा आहे.
advertisement
8/12
ही कार प्रत्यक्षात 'रोल्स रॉयस सिल्वर शॅडो सीरीज २' (Rolls Royce Silver Shadow Series II) आहे. ही कार त्या काळातील सर्वात आलिशान गाड्यांपैकी एक होती. रोल्स रॉयसमध्ये ६.७५ लिटरचं शक्तिशाली V8 इंजिन आहे. 
advertisement
9/12
या कारचं उत्पादन हे १९७७ ते १९८५ या दरम्यान झालं होतं. इंग्रजांनी १९४७ मध्येच भारत सोडला असल्यामुळे, या कारचा ब्रिटिश राजवटीशी कोणताही संबंध असणे शक्य नाही.
advertisement
10/12
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही कार एकेकाळी रस्त्यांची शान होती आणि २००४ सालच्या 'लकीर' या बॉलिवूड चित्रपटामध्येही ती दिसली होती. त्याकाळी ही कार जुन्या गाड्यांच्या प्रदर्शनांचं मुख्य आकर्षण असायची. मात्र आज तिची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
advertisement
11/12
अनेक वर्षांपासून बेवारस उभी असल्यामुळे कारच्या काचा फुटल्या आहेत,बाहेरील  बॉडी गंजली आहे आणि कारचा प्रसिद्ध 'स्पिरिट ऑफ एक्स्टसी' (Spirit of Ecstasy) लोगोदेखील गहाळ झाला आहे.
advertisement
12/12
मुळात कोणतेही घर किंवा वास्तू जर अनेक वर्षे बंद ठेवली, तर तिथली धूळ आणि शांततेमुळे एक भीतीदायक वातावरण तयार होतं. 'आयशा व्हिला'च्या बाबतीतही नेमके हेच झालं आहे. दरम्यानच्या काळात अशी चर्चा होती की कारचा मालक तिची दुरुस्ती करून घेईल, परंतु सध्याची परिस्थिती पाहता ते शक्य वाटत नाही.आज ही जागा केवळ युट्युबर्स आणि भुतबाधी जागा शोधणाऱ्या लोकांसाठी एक 'स्पॉट' बनला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Pune: लोणावळ्यातल्या एका बंगल्यात आजही उभी आहे Rolls Royce कार, कुणीही तिथे जात नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल