TRENDING:

Thar आणि फॉर्च्युनर आता विकून टाका! Tata ची लीजेंड SUV मार्केटवर राज्य करायला येतेय!

Last Updated:
आता टाटा मोटर्स एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. ९० च्या दशकामध्ये रस्त्यावर राज्य करणारी लीजेंड एसयूव्ही आता पुन्हा एकदा नव्या रुपात घेऊन येत आहे.
advertisement
1/8
Thar आणि फॉर्च्युनर आता विकून टाका! Tata ची SUV मार्केटवर राज्य करायला येतेय!
टाटा मोटर्स म्हणजे दणकट आणि सेफ्टीमध्ये ५ स्टार हे समीकरण आता बनलं आहे. मागील अनेक वर्षांपासून टाटाने सेफ्टी कारचा किताब पटकावला आहे. पण आता टाटा मोटर्स एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. ९० च्या दशकामध्ये रस्त्यावर राज्य करणारी लेंजड एसयूव्ही आता पुन्हा एकदा नव्या रुपात घेऊन येत आहे. या गाडीचं नाव आहे tata Sierra. टाटा आता ही गाडी याच महिन्यात २५ नोव्हेंबरला लाँच करणार आहे.
advertisement
2/8
Tata Sierra ही पहिल्यांदा जानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये पाहण्यास मिळाली होती. त्यानंतर टाटा सियारा कधी लाँच होणार याची सगळे जण वाट पाहत होते. पण आता प्रतिक्षा संपली आहे. २५ नोव्हेंबरला ही कार लाँच होणार हे फायनल आहे.
advertisement
3/8
नव्या  Tata Sierra मध्ये दमदार असे फिचर्स लाँच केले आहे. यामध्ये प्रीमियम साउंड सिस्टम, पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, Android ऑटो, Apple कार प्ले आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स दिले आहे.
advertisement
4/8
नव्या  Tata Sierra मध्ये 1.5 लिटर टर्बो–पेट्रोल इंजिन मिळणार आहे. जे 170hp आणि 280 Nm चा टॉर्क जनरेट करेल. या शिवाय  2.0-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय सुद्धा दिला आहे.   Sierra मध्ये 6 मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय मिळणार आहे.
advertisement
5/8
या शिवाय SUV AWD (ऑल–व्हील ड्राइव्ह) टेक्नॉलजी सुद्धा दिली जाणार आहे. भारतात सियाराची किंमत 10.50 लाख रुपयांपासून सुरू होईल.  भारतात या सियाराचा वाट पाहिली जात आहे.
advertisement
6/8
Level 2 ADAS आणि 6 एअरबॅग्स  - टाटा आपल्या या नव्या सियारामध्ये   6 एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), आणि Level 2 ADAS सारखे फिचर्स दिले जाणार आहे.
advertisement
7/8
या शिवाय 3 स्क्रीन सुद्धा दिसणार आहे. यामध्ये एक डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एक सेंट्रल टचस्क्रीन आणि एक पॅसेंजर साइड टचस्क्रीन असणार आहे. सगळ्या स्क्रीन 12.3 इंचाच्या असणार आहे.   एवढंच नाहीतर Sierra चं EV, पेट्रोल आणि डिझेल मॉडेल सुद्धा लाँच होईल.
advertisement
8/8
tata Sierra ला लूक हा सगळ्यात वेगळा आहे. या गाडीची थेट टक्कर ही टोयोटा फॉर्च्युनरशी असणार आहे. त्याचबरोबर हुंदाई, महिंद्रा थारलाही गाडी थेट भिडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Thar आणि फॉर्च्युनर आता विकून टाका! Tata ची लीजेंड SUV मार्केटवर राज्य करायला येतेय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल