Maruti ची SUV विकून टाका! Tata च्या नव्या SUV ने दिलं तब्बल 29.9 किमी रेकॉर्डब्रेक मायलेज!
- Published by:Sachin S
Last Updated:
Tata Sierra लाँच झाल्यापासून मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. लूक, दमदार इंजिन आणि किंमतीमुळे Tata Sierra चा सगळीकडे बोलबाला आहे. अशातच टाटा मोटर्सने सलग 12तास Tata Sierra चालवली.
advertisement
1/10

भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी पैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने अलीकडे आपली धाकड अशी Tata Sierra लाँच केली. Tata Sierra लाँच झाल्यापासून मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. लूक, दमदार इंजिन आणि किंमतीमुळे Tata Sierra चा सगळीकडे बोलबाला आहे. अशातच टाटा मोटर्सने सलग १२ तास Tata Sierra चालवली.
advertisement
2/10
यावेळी इंधन किती वापरलं आणि मायलेज किती आलं याची आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. Tata Sierra ने तब्बल 29.9 किमी इतकं दमदार मायलेज दिलं आहे. 29.9 किमी मायलेज देणारी भारतातली पहिली एसयूव्ही ठरली आहे. त्यामुळे Tata Sierra चा भीम पराक्रम हा India Book of Records मध्ये नोंदवला गेला आहे.
advertisement
3/10
टाटा मोटर्सकडून नव्याने लाँच केलेल्या Tata Sierra च्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जात आहे. अशातच इंदुरमध्ये NATRAX च्या ट्र्रॅकवर एक चाचणी घेण्यात आली. टाटाचं नवीन 1.5-लिटर Hyperion इंजिन असलेली Tata Sierra ला सलग कुठेही न ब्रेक घेता 12 तास चालवलं. यावेळी 29.9 किमी इतकं मायलेज दिल्याचं समोर आलं आहे. भारतात कोणत्याही SUV ने इतकं मायलेज देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
advertisement
4/10
इंदूरच्या National Automotive Test Tracks अर्थात NATRAX वर ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत Tata Sierra ची टेस्ट घेण्यात आली. सलग १२ तास कुठेही गाडी थांबली नाही.
advertisement
5/10
फक्त ड्रायव्हर बदलण्यासाठी छोटे ब्रेक घेतले होते. Tata Sierra मध्ये नव्याने 1.5L Hyperion पेट्रोल इंजिन दिलं आहे. Hyperion इंजिन हे इंधनाचा अचूक वापर आणि उत्तम मायलेज देण्यासाठी तयार केलं आहे.
advertisement
6/10
Hyperion इंजिनमध्ये अडवांस्ड कम्बशन सिस्टम आहे. टॉर्क-रिच परफॉर्मेंस बँड, फ्रिक्शन-ऑप्टिमाइज़्ड आर्किटेक्चर आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि समप्रमाणात इंधन इंजिनला पुरवलं जात असतं. त्यामुळे हा रेकॉर्ड साध्य झाला.
advertisement
7/10
Tata Motors चे पॅसेंजर व्हेईकल्सचे चीफ प्रोडक्ट अधिकारी मोहन सावरकर यांनी सांगितलं की, “Sierra चा प्रवास हा रेकॉर्डने सुरू झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक मायलेज देणारी Sierra ही पहिली एसयूव्ही ठरली आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
advertisement
8/10
Hyperion इंजिन हे प्लॅटफॉर्म पेट्रोल पॉवरट्रेनची क्षमता वाढवण्यासाठी तयार केलं आहे. हा रेकॉर्ड आता Sierra ची ताकद आणि दणकटपणा सिद्ध करत आहे. भविष्यात मार्केटमध्ये टाटा मोटर्स दमदार वाहनं आणण्यासाठी प्रतिबद्ध असणार आहे.
advertisement
9/10
एवढंच नाहीतर या ट्रॅकवर Sierra ने याच इंजिनवर तब्बल 222 किमी प्रति तास इतका वेग गाठला होता. एकीकडे एसयूव्ही टॉप स्पीडसाठी धडपड करत आहे, तिकडे Sierra ने एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपला नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
advertisement
10/10
Tata Sierra ची किंमत ही ११.४९ लाखांपासून सुरू होते तर टॉप मॉडेल हे १५.९९ लाखांपासून सुरू होईल ते १८.४९ लाखांपर्यंत आहे. Tata Sierra 2025 चं प्री बुकिंग सुरू झालं आहे, २१ हजारांमध्ये तुम्ही ही गाडी बूक करू शकतात. टाटाच्या अधिकृत डिलरशीप आणि ऑनलाईन सुरू होणार आहे. तर tata sierra ची डिलिव्हरी ही 16 जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti ची SUV विकून टाका! Tata च्या नव्या SUV ने दिलं तब्बल 29.9 किमी रेकॉर्डब्रेक मायलेज!