TRENDING:

'ही' आहे जगातील पहिली एयरबॅग असलेली स्कूटर! इंजिन, मायलेज सर्वच भारी

Last Updated:
यामाहाने जगातील पहिले एयरबॅग असलेले स्कूटर सादर केले आहे. यामुळे तुम्हाला यावर प्रवास करताना सेफ्टीचं टेन्शन नसतं. स्कूटरचं इंजिन, मायलेज किती आहे चला जाणून घेऊया.
advertisement
1/8
'ही' आहे जगातील पहिली एयरबॅग असलेली स्कूटर! इंजिन, मायलेज सर्वच भारी
मुंबई : एयरबॅग हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एखादी आलिशान कार येते. कारण कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एयरबॅग्स दिल्या जातात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व कारमध्ये सरकारने 6 एयरबॅग अनिवार्य केल्या आहेत. पण तुम्ही कधी स्कूटरमध्ये एयरबॅग असं ऐकलंय का? यापूर्वी नसेल ऐकलं. पण आता यामाहा कंपनीने आपली एयरबॅग असलेली जगातील पहिली स्कूटर सादर केली आहे.
advertisement
2/8
या स्कूटरचे नाव Yamaha Tricity 300 आहे. ही एक तीन चाकी स्कूटर आहे. जी चांगले बॅलेन्स आणि स्टेबिलिटीसाठी तयार करण्यात आली आहे. आता या कारमध्ये एयरबॅग्सही देण्यात आली आहेत. जे Autoliv सह मिळून तयार करण्यात आले आहेत.
advertisement
3/8
या स्कूटरचा एयरबॅग समोरच्या बाजूला लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सेन्सरच्या मदतीने काम करते. समोरुन टक्कर होताच एयरबॅग लगेच ओपन होते आणि रायडरला समोर कोसळण्यापासून वाचवण्यात मदत करते.
advertisement
4/8
कारप्रमाणे यामध्ये सीट बेल्ट नसतात. यामुळे ही सिस्टम विशेषतः अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की, प्रवासामध्ये जखम कमी व्हावी. या सिस्टमला अनेक टेस्ट आणि खऱ्या अॅक्सीटेंडसारख्या परिस्थितीमध्ये निरक्षण करण्यात आले आहे. ग्राहक ही स्कूटर एयरबॅग आणि एयरबॅगशिवाय अशा दोन्ही ऑप्शनमध्ये खरेदी करत आहेत.
advertisement
5/8
ही आहे एयरबॅग असणारी बाइक : टू-व्हीलरमध्ये एयरबॅग पूर्णपणे नाही. कारण Honda Gold Wing Tour सारख्या बाइकमध्ये पहिल्यापासूनच हे फीचर मिळते. मात्र स्कूटरमध्ये हे फीचर देणे सर्वसामान्य लोकांसाठी जास्त सोपे आणि उपयोगी ठरते.
advertisement
6/8
पहिले Piaggio MP3 सारख्या मॉडल्समध्ये अशा आयडिया पाहिल्या होत्या. मात्र अशा प्रकारची पूर्ण तयार स्कूटर पहिल्यांदाच आली आहे. डिझाइनविषयी बोलायचं झाल्यास, 2026 मध्ये मॉडल नवं आणि जास्त शॉर्प लूक देण्यात आला आहे. यामध्ये नवीन LED लाइट्स, बदललेला फ्रंट डिझाइन आणि नवा टेल लँप देण्यात आला आहे. ज्यामुळे हे जास्त मॉडर्न आणि स्पोर्टी दिसते. यासह व्हाइट, ग्रीन आणि ग्रीसारखे नवीन कलर ऑप्शनही देण्यात आले आहेत.
advertisement
7/8
इंजिन, पॉवर आणि मायलेज : इंजिनविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये 292cc चं इंजिन देण्यात आलं आहे. जे 28 PS ची पॉवर आणि 28.9 Nm टॉर्क देते. यामध्ये ऑटोमॅटिक गियरबॉक्स मिळते आणि हे जवळपास 30.3 kmplचं मायलेज देते. इंजिनमध्ये जास्त बदल केलेला नाही. मात्र नवीन एमिशन नियमांना पूर्ण करण्यासाठी यामध्ये नवीन कॅटेलिटिक कन्व्हर्टर जोडण्यात आलं आहे.
advertisement
8/8
ही स्कूटर 2026 मध्ये यूरोपमध्ये विक्रीसाठी येईल. येथे ग्राहक एयरबॅग ऑप्शनचा स्कूटर खरेदी करू शकतील. सध्या ही भारतात लॉन्च करण्याची कोणतीही योजना नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
'ही' आहे जगातील पहिली एयरबॅग असलेली स्कूटर! इंजिन, मायलेज सर्वच भारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल