TRENDING:

'धुरंधर 2' ची एंट्री, DDLJ 'आऊट'! 30 वर्षांत पहिल्यांदाच, 'मराठा मंदिर'मध्ये रणवीरने बॉलिवूडच्या 'किंग'चा 'राज' हलवला

Last Updated:
Dhurandhar 2 DDLJ : धुरंधर 2 मुळे 30 वर्षे जुनी फिल्म दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे म्हणजे DDLJ ला मोठा फटका बसला आहे.
advertisement
1/7
'धुरंधर 2' ची एंट्री, DDLJ 'आऊट'! 30 वर्षांत पहिल्यांदाच, 'मराठा मंदिर'मध्ये रणवीरने बॉलिवूडच्या 'किंग'चा 'राज' हलवला
धुरंधर 2, धुरंधर 2, धुरंधर 2... कित्येक दिवसांपासून धुरंधर 2 ची चर्चा आहे. अखेर धुरंधरचा दुसरा पार्ट धुरंधर : द रिव्हेंज आलाच. या फिल्मने कित्येक रेकॉर्ड मोडले आहेत. आता धुरंधर 2 ने आणखी एक इतिहास रचला आहे. गेल्या 30 वर्षांत जे कोणत्याच फिल्म्सने केलं नाही ते धुरंधर 2 ने केलं. धुरंधर 2 चं वादळ येताच 30 वर्षे जुनी फिल्म DDLJ लाही हादरवून टाकलं आहे.
advertisement
2/7
आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंगच्या फिल्मचं प्री-बुकिंग सुरू होतं. फिल्म रिलीज होण्याच फिल्मने कोट्यवधी रुपये कमवले आहेत. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा प्री-रिलीज प्रीमियर ठरला आहे.
advertisement
3/7
चित्रपटाची क्रेझ पाहत आणि चाहत्यांची प्रचंड डिमांड यामुळ अनेक थिएटर्सनी रात्री उशिराचे शोदेखील सुरू केल आहेत. इतकंच नाही तर मुंबईच्या प्रसिद्ध मराठा मंदिरनेही आपली जुनी परंपरा मोडली आहे. 
advertisement
4/7
धुरंधरसाठी मराठा मंदिरने 30 वर्षांत पहिल्यांदाच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या फिल्मची वेळ बदलली आहे.  1995 साली रिलीज झालेली ही फिल्म. शाहरूख खान आणि काजोल यांची रोमँटिक फिल्म. गेल्या 30 वर्षांपासून मराठी मंदिरात अजूनही दाखवली जाते आणि लोक ती पाहतात.
advertisement
5/7
या फिल्मची दररोज सकाळी 11.30 ही वेळ ठरलेली होती. पण आता धुरंधर 2 साठी पहिल्यांदाच या फिल्मची वेळ बदलण्यात आली आहे. 
advertisement
6/7
धुरंधर 2 फिल्म 3 तास 52 मिनिटांची आहे. जाहिरात, ट्रेलरसह एका शोला अंदाजे 4 तास 40 मिनिटं लागतील. एका स्क्रिनवर दिवसाला फक्त 4 शो शक्य आहेत. हे लक्षात घेता मीडिया रिपोर्टनुसार DDLJ ला सकाळच्या पहिल्या स्लॉटमध्ये हलवलं आहे.
advertisement
7/7
त्यामुळे रणवीर सिंहने आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा मराठा मंदिरमधील 'राज' हलवला आहे. राज आणि सीमरनची जागा त्याने घेतली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'धुरंधर 2' ची एंट्री, DDLJ 'आऊट'! 30 वर्षांत पहिल्यांदाच, 'मराठा मंदिर'मध्ये रणवीरने बॉलिवूडच्या 'किंग'चा 'राज' हलवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल