Aajache Rashibhavishya: गुढीपाडव्याला राजयोग! मेष ते मीन राशींना हवं ते मिळणार, ‘ही’ चूक टाळा, आजचं राशीभविष्य
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Daily Horoscope: आज गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने 12 राशींवर यांचा परिणाम पाहायला मिळत आहे. ज्योतिषी अशोक पाटील यांनी मेष ते मीन राशींचं आजचं राशीभविष्य सांगितले आहे.
advertisement
1/13

मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस हा सोने पे सुहागा पद्धतीचा असणार आहे. तुमच्या योग्य ग्रहमानामुळे आज उत्तम राजयोग तयार होण्याची शक्यता असून अचानक धनलाभ होऊ शकतो. जे काम हाती घ्याल त्यात यश नक्कीच मिळेल.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असणार आहे. गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येत आहे. शुक्राचा अनुकूल प्रभाव असल्यामुळे सुखसोयीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही करत असलेल्या कामाचं कौतुक देखील होणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस नजर हट्टी दुर्घटना घटी अशा पद्धतीचा असणार आहे. आज तुम्हाला सावधानगिरी बाळगावी लागणार आहे. तुमच्या राशीचा कुंभ, बुध मकर राशीत येऊन नवम प्रमुख त्रिकोण केंद्र स्थानात विराजमान आहे, त्याचबरोबर द्वादश स्थानाकडे संपूर्ण शुभ दृष्टी टाकत आहे. चंद्र मेष राशीत संचार करत आहे. या सर्व ग्रहमानामुळे वाद विवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवा.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र असणारा आहे. कधी खुशी कधी गम असा असणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना योग्य विचार करून घ्या. भावनेच्या भरात घेऊ नका. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मानसन्मान वाढेल.
advertisement
5/13
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा आहे. तुमच्या राशीमध्ये शुभयोग तयार होत असून यांचा चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहायला मिळेल. व्यवसायामध्ये प्रगती होईल, तसेच आज घेतलेले निर्णय योग्य ठरण्याची शक्यता आहे.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी गुढीपाडवा हा सुख समृद्धी घेऊन येत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी कामे पूर्ण होणार आहेत. मानसन्मान वाढेल. कामात यश मिळेल, तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.
advertisement
7/13
तूळ राशीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास उत्तम. छोट्या मोठ्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. परंतु तुम्ही यावर मात कराल. कुटुंबामध्ये समाधानकारक वातावरण असेल.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा व्यस्त असणार आहे. झोकून देऊन काम. मंगळाची स्थिर ऊर्जा तुम्हाला बळकट करत आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील.
advertisement
9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असणार आहे. काही शुभ योग तयार होत असून यांचा चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या कामात पाहायला मिळेल. ज्या कामासाठी तुम्ही अनेक दिवस कठोर मेहनत करत होता ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणाही होईल.
advertisement
10/13
मकर राशीच्या व्यक्तींनासुद्धा आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. तुमच्या मेहनतीला आज फळ मिळेल. व्यवसायामध्ये प्रगती होईल. नवीन योजनांचा विचार कराल. ताण तणाव कमी होईल. एकूणच तुमचा आजचा दिवस समाधानकारक जाणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या व्यक्तींना गुढीपाडवा हा सकारात्मक बदल घेऊन येत आहे. आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस हा धावपळीचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारीत वाढ होईल. अति काम आणि धावपळ यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे.
advertisement
12/13
मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कामांमध्ये फोकस वाढवण्याची गरज आहे. आर्थिक बाजू चांगली राहील. अचानक चांगली बातमी मिळेल. थोडाफार खर्च होण्याची शक्यता आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: गुढीपाडव्याला राजयोग! मेष ते मीन राशींना हवं ते मिळणार, ‘ही’ चूक टाळा, आजचं राशीभविष्य