कमी किंमतीत पॉवरफूल कार हवीये? टर्बो पेट्रोल इंजिनच्या या 5 कार आहेत बेस्ट ऑप्शन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
टर्बो-पेट्रोल इंजिनच्या गाड्या हायवेवर वेगाने चालवणे आणि ट्रॅफिकसमध्ये सहज सांभाळता येण्यामुळे खरेदीदारांमध्ये लोकप्रिय होतेय. यामागे अनेक कारणं आहेत. एक मोठं कारण म्हणजे, कारचा परफॉर्मेंस आहे. टर्बो पेट्रोल इंजिन असणाऱ्या कार रेग्युलर पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त टॉर्क जनरेट करण्यात सक्षम असतात. ज्यामुळे कारला चांगला परफॉर्मेंस मिळतो.
advertisement
1/8

टर्बो-पेट्रोल इंजिन खरेदीदारांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत कारण ते डिझेल इंजिनच्या तुलनेत टॉर्क देतात. ही इंजिने महामार्गावर वेगाने गाडी चालवण्यास प्राधान्य देणाऱ्या आणि रहदारीमध्ये गाडी सहजपणे हाताळू शकणाऱ्यांसाठी फायदेशीर आहेत.
advertisement
2/8
या बॅलेन्समुळे, भारतीय बाजारपेठेत अनेक एसयूव्हींच्या तुलनेत या पॉवरट्रेन पर्यायाला स्थान मिळाले आहे. तुम्ही अशाच व्हेरिएंटची कार शोधत असाल, तर आम्ही काही लोकप्रिय पर्याय निवडले आहेत जे बजेटमध्ये टर्बो-पेट्रोल इंजिनसह येतात.
advertisement
3/8
टाटा पंचला अलीकडेच भारतीय बाजारपेठेत एक नवीन रूप मिळाले आहे. या व्हर्जनचे टॉप-एंड व्हेरिएंट टर्बो-पेट्रोल इंजिनद्वारे सपोर्डेट आहेत. हे 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन नेक्सॉनकडून घेतले आहे.
advertisement
4/8
हे इंजिन 120 एचपी आणि 170 एनएम पीक टॉर्क निर्माण करते, जे सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. या पॉवरट्रेनसह मायक्रो एसयूव्हीची किंमत ₹8.29 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
advertisement
5/8
हुंडई वेन्यूमध्येही एक अशीच एसयूव्ही आहे, जिला नुकताच अपडेटेड व्हर्जन मिळाला आहे. यामध्ये एनए पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि डीझेल इंजिनचा ऑप्शन मिळतो.1.0-लीटर टर्बो पेट्रोल यूनिट 120 एचपीची पॉवर देते आणि यामध्ये सहा-स्पीड मॅन्युअल किंवा सात-स्पीड डीसीटीचा पर्याय देते. या व्हेरिएंटची किंमत 8.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासुन सुरु होते.
advertisement
6/8
महिंद्राची नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही XUV 7XO पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन ऑप्शनसह येते. दोन्हीही टर्बोचार्ज्ड आहे. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 2.0L mStallion टर्बोचार्ज्ड इंजिन मिळते. ज्यामध्ये टर्बोचार्ज्ड गॅसोलीन डायरेक्ट इंजेशन टेक्नॉलॉजी आहे. हे इंजिन 200 बीएचपीची जास्तीत जास्त पॉवर आणि 380 एनएम टार्क देते. यामध्ये सिक्स-स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्व्हर्डर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन आहे. याची सुरुवातीची किंमत 13.66 लाख रुपये आहे.
advertisement
7/8
टाटा मोर्टसी सर्वात जास्त विकली जाणारी एसयूव्ही टाटा नेक्सॉनमध्ये 1.2L थ्री-सिलेंडर टर्बोचार्ज्ड रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन मिळते. जे 118 बीएचपी ची पॉवर आणि 170 एनएमचे टॉर्क देतात. यामध्ये फाइव्ह-स्पीड मॅन्युअल, एएमटी आणि ड्यूल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय मिळतात. याची किंमत 7.31 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु होते.
advertisement
8/8
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स दोन इंजिन व्हेरिएंट्समध्ये येते. ज्यामध्ये 1.0L तीन-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल बूस्टरजेट इंजिन जे 98.9 बीएचपी आणि 148 एनएम टॉर्क निर्माण करते. फ्रॉन्क्स सहा-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायासह उपलब्ध आहे. किंमती ₹8.91 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
कमी किंमतीत पॉवरफूल कार हवीये? टर्बो पेट्रोल इंजिनच्या या 5 कार आहेत बेस्ट ऑप्शन