बुलेटपेक्षा पॉवरफुल बाईक, TVS ने आणलं दमदार Bike चं नवीन मॉडेल, किंमत सगळ्यात कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
TVS मोटर्सने मागील काही वर्षांपासून दमदार आणि पॉवरफुल बाईक लाँच करण्याचा धमाका लावला आहे. अशातच TVS ने आपली Ronin बाईकचं...
advertisement
1/7

भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या TVS मोटर्सने मागील काही वर्षांपासून दमदार आणि पॉवरफुल बाईक लाँच करण्याचा धमाका लावला आहे. अशातच TVS ने आपली Ronin बाईकचं Agonda Edition लाँच केलं आहे. विशेष म्हणजे, या बाईकची किंमत फक्त 1.31 लाख रुपये किंमत ठेवली आहे.
advertisement
2/7
टीव्हीएस मोटर्सने MotoSoul 5.0 मध्ये ही बाईक लाँच केली आहे. TVS Ronin ही आधीच मार्केटमध्ये आहे. त्याच बाईकचं Agonda Edition आणलं आहे. हे एक लिमिटेड व्हेरियंट आहे.
advertisement
3/7
गोव्यातील अगोंडा समुद्र किनाऱ्यावरून हे नाव दिलं आहे. अगोंडा समुद्र किनाराा शांत, स्वच्छ आणि सुंदर आहे. याचीच झलक TVS Ronin Agonda Edition मध्ये उतरवण्याचा प्रयत्न टीव्हीएसने केला आहे.
advertisement
4/7
TVS Ronin Agonda Edition चं हे व्हेरियंट स्टँडर्ड बेस व्हेरिएंट (1.26 लाख रुपये) आणि मिड-स्पेक व्हेरियंट हे 1.48 लाख रुपयांपासून सुरू होतं. TVS Ronin Agonda Edition मध्ये पूर्णपणे ग्राफिक दिलं आहे.
advertisement
5/7
TVS ने या बाइकमध्ये 225.9cc, सिंगल-सिलेंडर, ऑयल-कूल्ड इंजिन दिलं आहे जे, 20.4bhp इतकी पॉवर आणि 19.9Nm इतका टॉर्क जनरेट करतोय. या बाइकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर आणि असिस्ट क्लच दिलं आहे.
advertisement
6/7
तर, TVS Ronin Agonda Edition ही एक बेस व्हेरियंटवर तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या बाइकमध्ये सिंगल-चॅनल एबीएस आणि ब्लुटूथ कनेक्टिविटीसह एलसीडी डिस्प्ले दिला आहे.
advertisement
7/7
यामध्ये हाईयर ट्रिम्ससारखं ड्युल-चॅनल एबीएस, अॅडजस्टेबल लिवर किंवा युएसडी फ्रंट फोर्क सारखे फिचर्स दिले नाही. ही बाइक ज्या लोकांना कमी फिचर्स पाहिजे आणि दमदार इंजिन हवंय, अशा ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन बाईक तयार करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
बुलेटपेक्षा पॉवरफुल बाईक, TVS ने आणलं दमदार Bike चं नवीन मॉडेल, किंमत सगळ्यात कमी!