TRENDING:

Bajaj, Tvs च्या स्कुटर आता विसरा, Yamaha ने आणले किंग साईज Scooter, खतरनाक लूक

Last Updated:
जपानी वाहन उत्पादक कंपनी यामाहा मोटर्सने अखेर ईलेक्ट्रिक मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून यामाहाने आपली पहिली  Aerox E Electric Scooter लाँच केली आहे.
advertisement
1/8
Bajaj, Tvs च्या स्कुटर आता विसरा, Yamaha ने आणले किंग साईज Scooter, खतरनाक लूक
जपानी वाहन उत्पादक कंपनी यामाहा मोटर्सने अखेर ईलेक्ट्रिक मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून यामाहाने आपली पहिली  Aerox E Electric Scooter लाँच केली आहे. यासोबत एक   EC-06 ही सुद्धा ईव्ही स्कुटर आणली आहे.  पण  Aerox E ही वेगळी आणि हटके अशी ईव्ही स्कुटर आहे. आतापर्यंत भारतीय मार्केटमध्ये अशा लूकची स्कुटर कुणीच आणली नाही. ही स्कुटर  Aerox 155 चा अवतार आहे. 
advertisement
2/8
AEROX-E  यामाहाच्‍या  मॅक्‍सी स्‍पोर्ट्स श्रेणीतली स्कुटर आहे. या स्कुटरमध्ये  ९.४ किलोवॅट (पीक पॉवर), उच्च प्रवेगासाठी ४८ एनएम टॉर्क इलेक्ट्रिक मोटर आणि ड्युअल डिटेचेबल ३ किलोवॅट तास बॅटरी दिली आहे.
advertisement
3/8
  असाधारण कामगिरीसाठी ड्युअल बॅटरी उच्च ऊर्जा प्रकारच्या सेलद्वारे समर्थित आहेत. यात सहज काढण्यासाठी आणि घरी चार्जिंगसाठी एर्गोनॉमिक ग्रिप्स देखील आहेत.
advertisement
4/8
 AEROX-E मध्ये  ट्विन एलईडी क्लास डी हेडलाइट्स, एलईडी फ्लॅशर्स, 3D-इफेक्ट एलईडी टेललाइट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह मोठी रंगीत TFT स्क्रीन आहे. Y-कनेक्ट मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटी मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID) दिला आहे. 
advertisement
5/8
AEROX-E  मध्ये अनेक रायडिंग मोड्स - इको, स्टँडर्ड आणि पॉवर आहेत.  ज्यामध्ये 'बूस्ट' फंक्शनचा समावेश आहे ज्यामुळे रायडर्सना सुपरफास्ट स्पीड गाठता येते. 
advertisement
6/8
विशेष म्हणजे, या EV मध्ये रिव्हर्स मोड देखील दिला आहे. AEROX-E एकदा फुल रिचार्ज केल्यावर 106 किमी रेंज देते. 
advertisement
7/8
 AEROX-E मध्ये  ट्विन एलईडी क्लास डी हेडलाइट्स, एलईडी फ्लॅशर्स, 3D-इफेक्ट एलईडी टेललाइट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह मोठी रंगीत TFT स्क्रीन आहे. Y-कनेक्ट मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटी मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID) दिला आहे. 
advertisement
8/8
 AEROX-E ची टक्कर थेट मार्केटमध्ये आधीपासून असलेल्या tvs iqube आणि बजाज चेतक ईलेक्ट्रिक गाड्यांशी आहे. Aerox E ची किंमत १ लाखांच्या जवळपास असणार असा अंदाज आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Bajaj, Tvs च्या स्कुटर आता विसरा, Yamaha ने आणले किंग साईज Scooter, खतरनाक लूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल