photos : शिक्षणासाठी पैसे नव्हते तर सुरू केलं कुक्कुटपालन, आज तरुण कमावतोय लाखो रुपये
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अनेक जण बालपणापासून सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, अनेक जणांची घरची परिस्थिती नसते की त्यासाठी शक्य तितका पैसा लावता येईल आणि तयारी करता येईल. मात्र, तरीसुद्धा काही तरुण असे असतात जे व्यवसाय करुन आपले अस्तित्व सिद्ध करतात. आज अशाच एका मेहनती तरुणाची कहाणी जाणून घेऊयात. (नीरज कुमार, प्रतिनिधी)
advertisement
1/7

छोटू कुमार असे या तरुणाचे नाव आहे. बिहारच्या बेगुसराय येथील रहिवासी असलेल्या या तरुणाचे लहानपणापासून सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होते. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. यानंतरही छोटूने हार न मानता आपली परिस्थिती सुधारण्यासाठी कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/7
यासाठी गावातील सावकाराकडून कर्ज घेऊन त्याने जुन्या घराच्या झोपडीत 500 कोंबडीची पिल्ले घेऊन कुक्कुटपालन सुरू केले. यानंतर हळूहळू परिस्थिती बदलली आणि आज त्याच्याकडे 5000 हून अधिक कोंबड्या पाळल्या जात आहेत. या माध्यमातून छोटू हा दरमहा चांगले उत्पन्नही मिळत आहे.
advertisement
3/7
बेगुसरायपासून 22 किमी अंतरावर असलेल्या बलिया येथे छोटूचा जन्म झाला. अभ्यासासोबतच छोटू वडिलांना शेतीत मदत करायचा. मात्र, मध्यंतरी प्रथम वर्षानंतर आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याने शिक्षण सोडले आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात केली.
advertisement
4/7
यासाठी त्याने वडिलांच्या मदतीने गावातील सावकारांकडून 40 हजार रुपयांचे कर्ज काढून 500 कोंबड्या पाळल्या. हळूहळू त्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आणि आज तो 5200 कोंबड्यांचे पालनपोषण करत आहेत.
advertisement
5/7
छोटूने सांगितले की, तो गेल्या तीन वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायात आहे. हा व्यवसाय दररोज चालणारा आहे. बाजारात जितकी मागणी आहे, तितकी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने कुक्कुटपालन हा व्यवसाय म्हणून केला तर त्याला चांगला नफा मिळू शकतो.
advertisement
6/7
छोटू कुमारने दिलेल्या माहितीनुसार, तो 2800 चौरस फुटांच्या झोपडीत कुक्कुटपालन करत आहे. ही पिल्ले यूपीमधून आणली असून 35 दिवस संगोपन केल्यावर त्यांचे वजन सुमारे 2 किलो होते. या कालावधीत ते सुमारे 4 लाख रुपये येते. सर्व खर्च वजा केल्यावर 70 हजार रुपयांची बचत होते.
advertisement
7/7
दुर्गापूजा आणि छठ पुजा जवळ आल्यावर विक्री कमी होते. मात्र, यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बीपीएससी परीक्षेचा अभ्यास करुन अधिकारी होण्याचे छोटूचे स्वप्न आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
photos : शिक्षणासाठी पैसे नव्हते तर सुरू केलं कुक्कुटपालन, आज तरुण कमावतोय लाखो रुपये