TRENDING:

व्हिडिओ कॉलवर होती पत्नी आणि समोर गर्लफ्रेंड; दोघींच्या डोळ्यादेखत व्यक्तीने दिला जीव

Last Updated:
एक अतिशय हादरवणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर येत आहे. एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्यापासून वेगळं राहणाऱ्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
advertisement
1/7
व्हिडिओ कॉलवर पत्नी आणि समोर गर्लफ्रेंड; दोघींच्या डोळ्यादेखत तरुणाने दिला जीव
घटनेच्या वेळी त्याची कथित प्रेयसीही घटनास्थळी उपस्थित होती, असं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ही घटना गुरुवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमुआ गोपालपूर गावात घडली.
advertisement
2/7
पोलिस क्षेत्र अधिकारी वैभव पांडे यांनी सांगितलं की, सोनू नावाच्या एका व्यक्तीने व्हिडिओ कॉलवरून आपल्या पत्नीशी वाद घातला.
advertisement
3/7
यानंतर रागात त्याने आपल्या प्रेयसीसमोर देशी बनावटीच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतली.
advertisement
4/7
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि सोनूला जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
5/7
अशा घटनांमध्येही आजकाल वाढ होत असल्याचं दिसत आहे. अलीकडेच वैवाहिक वादातून इंस्टाग्रामवर लाइव्ह येत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी वाचवलं होतं.
advertisement
6/7
पोलिसांनी तत्परतेनं केलेल्या कारवाईमुळे त्याचे प्राण वाचले, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. 22 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला की, एकटा राहणारा त्याचा लहान भाऊ इंस्टाग्रामवर लाईव्ह पोस्ट करून आत्महत्या करत आहे. त्याला वाचवण्याचं आवाहन त्यानी पोलिसांना केलं.
advertisement
7/7
या व्यक्तीने स्वत:वर ब्लेडने वार करून स्वतःला गंभीर जखमी केलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. मात्र त्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. ज्यामुळे त्याचा जीव वाचला
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
व्हिडिओ कॉलवर होती पत्नी आणि समोर गर्लफ्रेंड; दोघींच्या डोळ्यादेखत व्यक्तीने दिला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल