What is Cyber Attack: काय आहे सायबर अटॅक? अनेकदा ऐकलं असेल पण यामध्ये नक्की काय होतं माहितीय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही सायबर अटॅकबद्दल अनेकदा ऐकलं असेल, पण सायबर अटॅक होतो म्हणजे नक्की काय होतं? याबद्दल अनेकांना माहिती नाही, तर अनेकांना अर्धवट माहिती आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/11

एक काळ असा होता जेव्हा इंटरनेट वापरण्यासाठी लोकांना सायबर कॅफेमध्ये जावं लागत होतं. पण आता मात्र प्रत्येकाकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट असतंच. प्रत्येकाला जणू आता त्याची सवयच लागली आहे. त्यामुळे आजकाल कोणीही इंटरनेटशिवाय राहू शकणार नाही.
advertisement
2/11
इंटरनेटनं लोकांचं आयुष्य सोपं केलं आहे, पण हाच इंटरनेट धोक्याची घंटा ही बनलं आहे. कारण यानंतर सायबर अटॅकचा धोका तयार झाला. हे एक असं डिजिटल हत्यार, जे क्षणात तुमचं सगळं बिघडवू शकतं.
advertisement
3/11
तुम्ही सायबर अटॅकबद्दल अनेकदा ऐकलं असेल, पण सायबर अटॅक होतो म्हणजे नक्की काय होतं? याबद्दल अनेकांना माहिती नाही, तर अनेकांना अर्धवट माहिती आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
4/11
काय असतो 'सायबर अटॅक'?सायबर अटॅक म्हणजे एखादी संगणक प्रणाली, नेटवर्क किंवा डिजिटल डिव्हाइसवर अनधिकृतपणे प्रवेश करून डेटा चोरणं, नष्ट करणं किंवा प्रणाली निष्क्रिय करणं. हे स्कॅमर्स या गोष्टी वैयक्तिक, आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी करतात. आता प्रश्न असा की हे अटॅक नेमके होतात कसे?
advertisement
5/11
कसे होतो ‘साइबर अटॅक’? तर यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
6/11
मालवेअर (Malware)यात व्हायरस, वर्म्स, ट्रोजन आणि रॅन्समवेअर सारख्या सॉफ्टवेअरचा समावेश असतो. हे सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईल किंवा संगणकात शिरून तुमचा डेटा खराब करतात, चोरतात किंवा संपूर्ण सिस्टमच निष्क्रिय करतात. हे मुख्यतः फसवणूक करणाऱ्या ईमेल्स किंवा फेक वेबसाइट्सद्वारे पसरतात.
advertisement
7/11
फिशिंग (Phishing)स्कॅमर्स खोट्या ईमेल्स, मेसेजेस किंवा वेबसाइट्सद्वारे स्वतःला बँक, पोलीस किंवा सरकारी अधिकारी सांगून तुमच्याकडून पासवर्ड, ओटीपी, क्रेडिट कार्ड नंबर अशी संवेदनशील माहिती उकळतात.
advertisement
8/11
डिनायल ऑफ सर्विस (DoS / DDoS) अटॅकयामध्ये हॅकर्स एखाद्या वेबसाइटवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाठवतात, ज्यामुळे ती साइट क्रॅश होते आणि सामान्य युजर्ससाठी ती अनुपलब्ध होते. अनेकदा मोठ्या कंपन्यांवर किंवा बँकिंग साइट्सवर हे हल्ले होतात.
advertisement
9/11
डेटा चोरी: वैयक्तिक माहिती, ग्राहकांचे डेटा किंवा बिझनेसची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. ही माहिती ओळख चोरीसाठी किंवा डार्क वेबवर विक्रीसाठी वापरली जाऊ शकते.
advertisement
10/11
विश्वास आणि प्रतिष्ठेचं नुकसान: कंपन्यांच्या बाबतीत ग्राहकांचा विश्वास ढासळतो. परिणामी ग्राहक गमावले जातात आणि ब्रँडची प्रतिमा खराब होते.
advertisement
11/11
सतर्क राहणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, मजबूत पासवर्ड वापरा, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू ठेवा आणि तुमचं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
What is Cyber Attack: काय आहे सायबर अटॅक? अनेकदा ऐकलं असेल पण यामध्ये नक्की काय होतं माहितीय?