OTT च्या टॉप 10 इंडियन हॉरर मुव्ही! पाहाल तर रात्री डचकून उठाल, शेवटची तर कल्ट क्लासिक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Indian Horror Films on OTT : सध्या सर्वत्र हॉरर सिनेमे आणि वेब सीरिजची क्रेझ पाहायला मिळतेय. Amazon Prime Video, Netflix आणि JioHotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर अशा अनेक हॉरर सीरिज आणि सिनेमे आहेत जे तुम्ही सहज पाहू शकता. IMDb वरील उपलब्ध असलेल्या टॉप 10 इंडियन हॉरर सिनेमे जे पाहिल्यानंतर रात्री एकटं उठण्याची तुमची हिम्मत होणार नाही.
advertisement
1/11

सध्या सर्वत्र हॉरर सिनेमे आणि वेब सीरिजची क्रेझ पाहायला मिळतेय. Amazon Prime Video, Netflix आणि JioHotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर अशा अनेक हॉरर सीरिज आणि सिनेमे आहेत जे तुम्ही सहज पाहू शकता. IMDb वरील उपलब्ध असलेल्या टॉप 10 इंडियन हॉरर सिनेमे जे पाहिल्यानंतर रात्री एकटं उठण्याची तुमची हिम्मत होणार नाही.
advertisement
2/11
मणिचित्रथाझु : हा मल्याळम भाषेतील सायकोलॉजिकल हॉरर सिनेमा आहे. ज्यात एका स्त्री आणि तिच्या कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली आहे. शोभना, मोहनलाल आणि सुरेश गोपी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. 'भूल भुलैया' हा हिंदी सिनेमा याच सिनेमाचा रिमेक आहे.
advertisement
3/11
तुंबाड : 1918 - 1947 दरम्यानचा काळ सिनेमाक दाखवण्यात आला आहे. या हॉरर सिनेमात लोभ आणि शापाची एक रोमांचक गोष्ट दाखवण्यात आली आहे. एक कुटुंब एका प्राचीन, काळ्या शक्तीने व्यापलेल्या लपलेल्या खजिन्याचा पाठलाग करते. भयानक सीन्स आणि हार्श कथानक या सिनेमाचं खास वैशिष्ट्य आहे.
advertisement
4/11
पिज्जा : कार्तिक सुब्बाराज यांचा हा तमिळ हॉरर सिनेमा एका झपाटलेल्या घरात अडकलेल्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयची कथा आहे. सूड घेणारे आत्मे आणि वेळेच्या चक्रांचा सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. विजय सेतुपतीने यात जबरदस्त अभिनय केला आहे.
advertisement
5/11
स्त्री : चंदेरी या छोट्या गावात गावातील हॉरर-कॉमेडी म्हणजे स्त्री हा सिनेमा आहे. एका गूढ आत्म्याची ही स्टोरी आहे. एक स्त्री आत्मा जो रात्रीच्या वेळी पुरुषांचे अपहरण करते आणि त्यांचे कपडे मागे ठेवते. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री या सिनेमात आहे.
advertisement
6/11
माया : अश्विन सरवनन यांचा तमिळ नव-नॉयर हॉरर सिनेमा माया. यात अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत आहे. सस्पेन्स आणि हॉररचा फुलऑन डोस या सिनेमात पहायला मिळेल.
advertisement
7/11
भूल भुलैया : प्रियदर्शन यांच्या 'मणिचित्रथझू' या सिनेमाता हा हिंदी रिमेक आहे. अक्षय कुमार आणि विद्या बालन यांची मंजुलिकाची स्टोरी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
advertisement
8/11
13 बी: फियर हेज़ ए न्यू एड्रेस : हा एक सायकोलॉजिक हॉरर सिनेमा आहे. एक टीव्ही शो पाहताना एका कुटुंबाला विचित्र अनुभव येतो. पुढे ते त्या टीव्ही शोची स्वत: जीवनाशी नक्कल करू लागतात. सिनेमात इतका सस्पेन्स भरलेला आहे की पाहताना तुमची नक्कीच घाबरघुंडी उडेल.
advertisement
9/11
गो गोवा गॉन : सैफ अली खान, कुणाल केम्मू आणि वीर दास अभिनीत भारतातील पहिला झोम्बी कॉमेडी. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. समुद्रकिनाऱ्यावरील पार्टी झोम्बी हल्ल्यात बदलते. सुट्ट्यांसाठी आलेल्या मित्रांबरोबर पुढे काय काय घडलं हे पाहणं मजेशीर आहे.
advertisement
10/11
बुलबुल : अनुष्का शर्मा हा हॉरर-थ्रिलर सिनेमा आहे. जो बंगाली लोककथांवर आधारित आहे. ही एका महिलेच्या सूडाची गोष्ट आहे. जी लोककथा आणि सस्पेन्सने भरलेली आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरीही यात महत्त्वाच्या भुमिकेत आहे.
advertisement
11/11
राज : हा हिंदीतील एक कल्ट क्लासिक सिनेमा आहे. बिपाशा बसू आणि दिनो मोरिया यांची उटीमधील सुट्टी अनपेक्षित ट्विस्ट, विश्वासघात अनपेक्षित घटनांनी भरलेला हा सिनेमा पाहताना तुम्ही थक्क होऊन जाल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT च्या टॉप 10 इंडियन हॉरर मुव्ही! पाहाल तर रात्री डचकून उठाल, शेवटची तर कल्ट क्लासिक