1 एप्रिलला रिलीज केली फिल्म, झाली हिट! पण नंतर फिल्मच्या दोन्ही अभिनेत्री 'गायब', नेमकं काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Film Celebrity Story : प्रचंड कमाई करणारी ही लो बजेच फिल्म, बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरली, पण काही काळानंतर त्यातील दोन्ही मुख्य हिरोईन पडद्यावरून दिसेनाशा झाल्या.
advertisement
1/7

1 एप्रिल 1983 चा तो दिवस, या दिवशी एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि तीन प्रसिद्ध कलाकार यांची फिल्म रिलीज झाली. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा होता आणि त्याची गाणी आधीच खूप लोकप्रिय झाली होती.
advertisement
2/7
रिपोर्टनुसार फक्त 80 लाखांच्या बजेटमध्ये बनवलेली ही फिल्म, जिने बॉक्स ऑफिसवर जवळपास 3 कोटी रुपयांची कमाई करून त्या वेळी ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळवला. आजही ही फिल्म लो बजेटमध्ये प्रचंड कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक मानली जाते.
advertisement
3/7
फिल्म रिलीज झाल्यानंतर सुरुवात संथ होती. पहिल्या आठवड्यात काही थिएटरमध्ये मध्यम प्रतिसाद मिळाला पण नंतर संगीत, गाण्यांमुळे फिल्म हिट झाली. फिल्मची गाणी चांगलीच गाजली.
advertisement
4/7
जे. ओम प्रकाश यांनी दिग्दर्शित केलेली ही फिल्म. या फिल्मची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती, तर संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिलं होतं.
advertisement
5/7
या फिल्मची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही फिल्म केल्यानंतर फिल्ममधील दोन्ही मुख्य अभिनेत्री पडद्यावरून गायब झाल्या. ही फिल्म आहे अर्पण.
advertisement
6/7
पहिली अभिनेत्री म्हणजे रीना रॉय. ज्यांनी जितेंद्र यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट दिले होते. 'अर्पण'नंतर त्यांनी आणखी काही चित्रपट केले, पण हळूहळू पडद्यावर त्या कमी दिसू लागल्या. 1980 च्या दशकाच्या अखेरीस त्यांची सक्रियता कमी झाली होती. नंतर त्यांनी लग्न केलं आणि आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत केलं.
advertisement
7/7
दुसरी अभिनेत्री परवीन बाबी. 1970 च्या दशकातील ग्लॅमर गर्ल, एक स्टाईल आयकॉन. मॅगझीनच्या फ्रंट पेजवर असायची. 'अर्पण'नंतर ती काही चित्रपटांमध्ये दिसली, पण 1980 च्या दशकाच्या मध्यापर्यंत तिचं अस्तित्व संपुष्टात आलं. 983 मध्ये ती चित्रपटसृष्टीतून नाहीशीच झाली. नंतर ती मानसिक समस्यांनी त्रस्त असल्याचं समोर आलं. ती एकाकी जीवन जगत होती आणि 2005 मध्ये मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत आढळली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
1 एप्रिलला रिलीज केली फिल्म, झाली हिट! पण नंतर फिल्मच्या दोन्ही अभिनेत्री 'गायब', नेमकं काय घडलं?