Malaika Arora Fitness: 51 वर्षाच्या मलायकाचा फिटनेस तरुणींना लाजवणारा; डाएट, योगा आणि 'हे' आहे सीक्रेट!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Malaika Arora Fitness: मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या 51 व्या वर्षीही ती तरुणींना लाजवेल अशी फिगर आणि फिटनेस आहे.
advertisement
1/7

मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या 51 व्या वर्षीही ती तरुणींना लाजवेल अशी फिगर आणि फिटनेस आहे.
advertisement
2/7
बॉलीवूडची 'फिटनेस क्वीन' म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. वयाच्या 51व्या वर्षीही ती केवळ तरुणींनाच नव्हे तर नव्या पिढीतील मॉडेल्सनाही जबरदस्त टक्कर देते.
advertisement
3/7
मलायका तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. तिच्या फिटनेस, निरोगी लाइफचं काय सीक्रेट आहे? याविषयी आज जाणून घेऊया.
advertisement
4/7
मलायकाचा फिटनेस केवळ व्यायामापुरता मर्यादित नाही. ती ऑक्सिजन थेरपी घेते, रोज पावलांचं ठराविक लक्ष्य पूर्ण करते. सूर्यप्रकाश आणि ताजी हवा यांना तिच्या रूटीनमध्ये महत्वाचं स्थान आहे. तिचं म्हणणं आहे की “सनस्क्रीन, पाणी आणि चालणं ही माझ्या आयुष्याची तीन मॅजिक मंत्रं आहेत.”
advertisement
5/7
व्यायामासोबतच ती तिच्या आहारावरही विशेष लक्ष देते. ती कोणताही जंक फूड खात नाही. तिच्या आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, अंडी, चिकन आणि मासे यांचा समावेश असतो. ती दिवसभर भरपूर पाणी पिते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
advertisement
6/7
ती सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिते.नाश्त्यामध्ये ती अंडी, फळे किंवा ओट्स घेते. दुपारच्या जेवणामध्ये ती चपाती, भाजी, डाळ आणि सॅलड घेते.
advertisement
7/7
रात्रीचे जेवण ती शक्यतो लवकर आणि हलके घेते. रात्रीच्या जेवणात सूप, सॅलड किंवा भाज्यांचा समावेश असतो. मलायकाच्या फिटनेसमागचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे तिची नियमितता आणि शिस्त. ती कोणताही दिवस चुकवत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Malaika Arora Fitness: 51 वर्षाच्या मलायकाचा फिटनेस तरुणींना लाजवणारा; डाएट, योगा आणि 'हे' आहे सीक्रेट!