TRENDING:

लग्नाच्या 15 दिवसांतच बांदेकरांचा लेक अन् सुनेने थाटला वेगळा संसार? सोहम-पूजाचा तो फोटो व्हायरल

Last Updated:
अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर लग्नाच्या 15 दिवसांतच नव्या घरात शिफ्ट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. सोहम आणि पूजाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
1/8
लग्नानंतर बांदेकरांचा लेक अन् सुनेने थाटला वेगळा संसार?सोहम-पूजाचा PHOTO VIRAL
अभिनेते आदेश बांदेकर यांचा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी 2 डिसेंबर रोजी लग्न केलं. दोघांच्या लग्नाची इंडस्ट्रीत खूप चर्चा झाली. लोणावण्यात त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर मुंबईत दोघांच्या लग्नाचं खास रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं
advertisement
2/8
रिसेप्शनला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सोहम आणि पूजा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/8
सोहम आणि पूजाच्या लग्नाला 15 दिवस होत नाही तोच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लग्नानंतर पूजा आणि सोहम वेगळ्या घरात राहायला गेल्याचं म्हटलं जात आहे. एका फोटोमुळे या चर्चा रंगल्या आहेत. असं काय झालं ज्यामुळे सोहम आणि पूजा यांनी लग्नाच्या 15 दिवसांतच नवा संसार थाटला आहे.
advertisement
4/8
लग्नाची सुट्टी संपवून अभिनेत्री पूजा बिरारी कामावर परतली आहे. तिनं येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या शूटींगला सुरुवात केली आहे. सेटवरचे फोटो देखील तिनं शेअर केले होते.
advertisement
5/8
पूजा आणि सोहम यांचा एक फोटो त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्यानंतर तो फोटो त्यांच्या फॅन पेजवरही शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सोहम आणि पूजा एका घरात उभे आहेत. पूजाच्या हातात घराच्या किल्ल्या दिसत आहेत. दोघे प्रचंड आनंदी दिसत आहेत.
advertisement
6/8
पूजा आणि सोहम हे लग्नानंतर नव्या घरात शिफ्ट झाल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांआधी सोहमची आई म्हणजेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी एका मुलाखतीत बोलताना लग्नानंतर सोहम त्याच्या बायकोसोबत वेगळ्या घरी राहणार हे मी आधीच सांगितलं आहे, असं म्हणाल्या होत्या.
advertisement
7/8
सुचित्रा म्हणालेल्या, "आदेशच्या आईचं असं म्हणणं होतं की लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं. तुमचा संसार तुम्ही करायचा. तुम्हाला काही लागलं तर मी आहे.मी पण त्याच कॉन्सेप्टची आहे. मी सोहमला सांगितलंय, लग्नानंतर वेगळं घर शोध, वेगळ्या घरात मजेत राहा. आईबाबा आहेतच."
advertisement
8/8
सुचित्रा बांदेकर यांच्या म्हणण्यांनुसार, सोहम आणि पूजा लग्नानंतर वेगळ्या घरात राहायला गेले असू शकतात. पण दोघांनी किंवा बांदेकर कुटुंबाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नाच्या 15 दिवसांतच बांदेकरांचा लेक अन् सुनेने थाटला वेगळा संसार? सोहम-पूजाचा तो फोटो व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल