आई कुठे काय करते फेम अभिनेता पुन्हा 'आई'च्या मालिकेत, साकारणार ऐतिहासिक भूमिका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेता पुन्हा 'आई'च्या मालिकेत दिसणार आहे. त्याचा मालिकेतील पहिला लुक समोर आला आहे.
advertisement
1/9

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली. मालिकेतील सगळी पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. मालिका संपली असली तरी मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
advertisement
2/9
आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर त्यातील कलाकारांना नव्या मालिकेत काम मिळालं. मालिकेतील अरुंधतीचा मुलगा पुन्हा आईच्या मालिकेत दिसणार आहे. आईच्या मालिकेत म्हणजे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
3/9
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं सावित्री बाईंची भूमिका साकारली आहे. याच मालिकेत अभिषेक देशमुख देखील दिसणार आहे.
advertisement
4/9
चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांचा बालपणातील प्रवास, त्यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यातील प्रसंग, सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न आणि जोतीरावांची शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड या सर्व टप्प्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
advertisement
5/9
आता ही मालिका एका महत्त्वाच्या वळणावर येत आहे. लवकरच प्रेक्षकांना सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या तारुण्यावस्थेतील नवा अध्याय अनुभवायला मिळणार आहे. या टप्प्यात समाजातील रूढी-परंपरांची आव्हानं आणि सावित्रीबाईंनी शिकावं, स्वावलंबी व्हावं यासाठी जोतीरावांनी केलेले प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.
advertisement
6/9
या नव्या टप्प्यात सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक देशमुखनं आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या मुलाची यशची भूमिका साकारली होती. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री राजसी भावे सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या प्रभावी अभिनयातून समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी कथा अधिक सशक्तपणे उलगडताना दिसणार आहे.
advertisement
7/9
भूमिकेविषयी बोलताना अभिनेता अभिषेक देशमुख म्हणाला, "इतकं महान व्यक्तिमत्त्व साकारायला मिळतंय याचा आनंद गगनात मावत नाहीय. मी या मालिकेचा मोठा चाहता आहे. पहिल्या एपिसोडपासून ही मालिका मी न चुकता पहातोय. मालिकेची कथा खूप अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्वक लिहिलेली आहे. त्यामुळे जेव्हा जोतीरावांच्या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा वेगळा अभ्यास करावा लागला नाही."
advertisement
8/9
"मालिकेच्या कथेतूनच माझा सराव आणि अभ्यास झाला. आई कुठे काय करते नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह परिवारात सामील होतोय त्यामुळे माझ्यासाठी हा दुग्धशर्करा योग आहे अशी भावना अभिषेकने व्यक्त केली."
advertisement
9/9
या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री राजसी भावे म्हणाली, "माझ्या आयुष्यातली पहिली मालिका तेही स्टार प्रवाहसोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावित्रीबाई साकारायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत असलेल्या तक्षा शेट्टीने ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळे तिच्याकडून खूप गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. ही भूमिका फार मनाच्या जवळची आहे. थोड्या काळासाठी का होईना ती साकारायला मिळणं पर्वणी आहे माझ्यासाठी."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आई कुठे काय करते फेम अभिनेता पुन्हा 'आई'च्या मालिकेत, साकारणार ऐतिहासिक भूमिका