अरुंधतीची लेक घेणार या हिंदी मालिकेत एंट्री; आई कुठे काय करते मधून घेणार एक्झिट?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे. तिने या मालिकेत ईशाची भूमिका साकारली आहे. आता लवकरच ही अभिनेत्री एका हिंदी मालिकेत दिसणार आहे. त्यामुळे ती आता आई कुठे काय करते मधून बाहेर पडणार की काय असा प्रश्न चाहत्यांना आहे.
advertisement
1/8

'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे.
advertisement
2/8
अपूर्वाने या मालिकेत अल्लड ईशाची भूमिका साकारत सगळ्यांचं मन जिंकलं आहे.
advertisement
3/8
अपूर्वा गोरेला 'ईशा' या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. गेली चार वर्ष ती या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
advertisement
4/8
आता अपूर्वा लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. कोणत्याही मराठी नाही तर एका हिंदी मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
5/8
अभिनेत्रीने याची माहिती इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना दिली आहे. स्टार प्लसवरील ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेत अपूर्वा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा प्रोमो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
advertisement
6/8
अपूर्वाने 'एक नवी सुरुवात, एक नवा प्रवास, एक नवा अध्याय…आपण सगळे मिळून कुणाल आणि वंदनाच्या प्रेमाचे साक्षीदार होऊया. २१ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता स्टार प्लसवर ‘बातें कुछ अनकही सी’ही मालिका पाहायला विसरु नका.' असं म्हणत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
advertisement
7/8
सध्या चाहते अपूर्वाला या नव्या मालिकेसाठी शुभेच्छा देत आहेत. आता ती या मालिकेत कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
advertisement
8/8
लवकरच ही अभिनेत्री एका हिंदी मालिकेत दिसणार असल्यामुळे ती आता आई कुठे काय करते मधून बाहेर पडणार की काय असा प्रश्न चाहत्यांना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अरुंधतीची लेक घेणार या हिंदी मालिकेत एंट्री; आई कुठे काय करते मधून घेणार एक्झिट?