दोघांनी अर्धवट सोडले शिक्षण, तर एकाचे झाले MBA, बच्चन कुटूंबात नेमके कोण किती शिकले ?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Bachhan Famillty : अभिनेते अमिताभ बच्चन यांचे कुटूंब अनेक कारणांनी चर्चेत असते. त्यांच्या कुटूंबाचे नेमके शिक्षण किती झाले हा कायमच प्रश्न पडतो.
advertisement
1/10

मनोरंजन विश्वातील अभिनेते नेमके किती शिकले असतील हे जाणून घेण्याची इच्छा सर्वच चाहत्यांना असते. आज अशा एका बॉलिवूड फॅमिली विषयी सांगणार आहोत, त्यांचे शिक्षण ऐकून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल.
advertisement
2/10
बॉलिवूडची काही कुटूंबं ही आपल्या अभिनयानेच नाही, तर घेतलेल्या मोठ मोठ्या शैक्षणिक पदव्यांमुळे पण चर्चेत असतात.
advertisement
3/10
आज बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या फॅमिली मध्ये सगळेच चांगले शिकलेले आहेत. त्यांनी सगळ्यांनीच उच्च दर्जाचे शिक्षण घेतले आहे.
advertisement
4/10
काहींनी त्या शिक्षणावर व्यवसाय केले तर काहींनी ते सोडून वेगळ्याच क्षेत्रात आपले नाव कमवले. खरंतर अमिताभ बच्चन हे हिंदीतील प्रसिध्द लेखक हरीवंशराय बच्चन यांचे चिरंजीव आहेत.
advertisement
5/10
अमिताभ यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 ला अलाहाबाद येथे झाला. 82 व्या वर्षीही ते सध्या बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते आहेत. त्यांनी आपले शिक्षण हे अलाहाबादच्या बॉईज स्कूल मधून केले. त्यानंतर त्यांनी शेरवूड कॉलेजमध्ये पुढील शिक्षण केले.
advertisement
6/10
1962 ला दिल्लीच्या करोडीमल कॉलेज मधून पदवी शिक्षण केले. ते एकदा 'कोण होणार करोडपती' शोमध्ये म्हणाले, "बारावीला मला सायन्सला चांगले मार्क्स मिळाले होते. त्यामुळे मी पदवीला बीएससीसाठी प्रवेश घेतला. पण मी फिजिक्स मध्ये नापास झालो."
advertisement
7/10
अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूल मध्ये शिक्षण घेतल्यावर, पुढील शिक्षणासाठी त्याने अमेरीकेच्या बोस्टन विद्यापिठातून बिजनेस कोर्स साठी प्रवेश घेतला. पण त्याने ते अर्ध्यावरच सोडले.
advertisement
8/10
अभिषेकच्या पत्नीने म्हणजेच ऐश्वर्या रायने संसद अकादमी आर्कीटेक्चर मधून पदवी मिळवली आहे. पण मॉडेलिंग आणि अभिनय करियरसाठी तिने मध्येच शिक्षणाला राम राम ठोकला.
advertisement
9/10
अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चनने बिजनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर डिग्री केली. तिच्या मुलीने म्हणजेच नव्या नंदाने न्युयॉर्कच्या फोर्डहम विद्यापिठातून डिजिटल टेक्नॉलॉजी आणि यूएक्स डिजाइन मध्ये पदवी केली.
advertisement
10/10
अभिषेक बच्चनला हल्लीच सर्वोत्कृष्ट अभिनेता अवॉर्ड मिळाला आहे. त्यामुळे हे वर्ष त्याच्यासाठी खूपच खास आहे. पण या पुरस्कारामुळे त्याला अनेक नेटकऱ्यांच्या टिकेचा सामना करावा लागत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दोघांनी अर्धवट सोडले शिक्षण, तर एकाचे झाले MBA, बच्चन कुटूंबात नेमके कोण किती शिकले ?