'सम्राट' बनून रातोरात मिळाली प्रसिद्धी, तब्बल 7 वर्षांनी मराठी TV वर दिसणार हा अभिनेता
- Published by:Minal Gurav
Last Updated:
तब्बल सात वर्षांनी टेलिव्हिजन आणि सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री मराठी मालिकेत दिसणार आहे. मालिकेतील त्याची पहिली झलक समोर आली आहे.
advertisement
1/7

मराठी मालिका </a>आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या." width="1600" height="900" /> टेलिव्हिजनचा असा एक अभिनेता जो स्टार असूनही स्वत: स्टार नाही तर मी अभिनेता आहे असं म्हणतो. त्याने आजवर अनेक हिंदी, मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
advertisement
2/7
'सम्राट' बनून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्याने कधी काळी बी ग्रेड सिनेमांतही काम केलं. पण गेल्या काही वर्षांपासून हा अभिनेता टेलिव्हिजन पासून दूर आहे.
advertisement
3/7
पण आता अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तब्बल सात वर्षांनी हा हँडसम अभिनेता मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय.
advertisement
4/7
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे समीर धर्माधिकारी. स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेच्या निमित्ताने समीर धर्माधिकारी बऱ्याच काळानंतर मालिका विश्वात पुनरागमन करणार आहेत. समीर धर्माधिकारी प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची भूमिका साकारणार आहेत.
advertisement
5/7
या भूमिकेविषयी सांगताना समीर धर्माधिकारी म्हणाले, "स्टार प्रवाहसोबतची माझी ही पहिली मालिका. जवळपास ७ वर्षांनंतर पुन्हा मालिका करतोय. प्रचंड उत्सुकता आहे. मालिकेची टीम खूप छान आहे. वेगळा विषय हाताळला जातोय."
advertisement
6/7
"युगंधर ही व्यक्तिरेखा मी साकारणार आहे. युगंधरला कामापेक्षा महत्त्वाचं काही नाही. काम म्हणजे धर्म त्याच्यासाठी. गावातील माणसांसाठी युगंधरचा शब्द हा अंतिम असतो."
advertisement
7/7
"एक काळ असा होता जेव्हा गावातले लोक बेरोजगार होते. त्यावेळी घरटी प्रत्येकाला त्याने त्याच्या मिलमध्ये काम दिलं. त्यामुळे कित्येक संसार तरले, घरं तरली. आजही लोक त्याला देव मानतात. प्रेक्षकांना ही मालिका आणि माझी भूमिका नक्की आवडेल याची खात्री आहे", असंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सम्राट' बनून रातोरात मिळाली प्रसिद्धी, तब्बल 7 वर्षांनी मराठी TV वर दिसणार हा अभिनेता