TRENDING:

गिरिजा ओकची 5 एपिसोडची सीरिज, Netflix वर येताच बनली नंबर वन; बायोग्राफिकल ड्रामा OTT वर हिट

Last Updated:
OTT Top Trending : अभिनेत्री गिरिजा ओक आणि विनीत कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेली वेब सीरिज OTT वर ट्रेंडमध्ये आहे. रिलीजच्या अवघ्या चोवीस तासात ही सीरिज नंबर वन ठरली आहे.
advertisement
1/8
गिरिजा ओकची 5 एपिसोडची सीरिज, Netflix वर येताच बनली नंबर वन
ओटीटी </a>प्लॅटफॉर्म्सवर रिलीज झाले आहेत. त्यातील एक वेब सीरिज रिलीज होताच काही तासातच नेटफ्लिक्सवर टॉपमध्ये ट्रेंड करतेय." width="1600" height="900" /> मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्रवारी तब्बल 15 सिनेमे आणि वेब सीरिज वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज झाले आहेत. त्यातील एक वेब सीरिज रिलीज होताच काही तासातच नेटफ्लिक्सवर टॉपमध्ये ट्रेंड करतेय.
advertisement
2/8
अभिनेत्री गिरिजा ओक या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज एक बायोग्राफिकल ड्रामा आहे. ही सीरिज फक्त 5 एपिसोडची आहे. 6 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली.
advertisement
3/8
रिलीजच्या 24 तासात सीरिजनं नंबर वन ट्रेंड करत आहे. आयुष्यात आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देणारी ही सीरिज आहे.
advertisement
4/8
कोटा हे स्वप्नांचे शहर आहे जिथे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण होतात. या सुवर्ण प्रवासात, शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात, ते केवळ त्यांच्या अभ्यासावरच नव्हे तर मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. ही सीरिज विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षकाची भावनिक आणि प्रेरणादायी स्टोरी आहे.
advertisement
5/8
आपण बोलत आहोत ती बायोग्राफिकल वेब सीरिजचं नाव आहे 'हॅलो बच्चो'. ही एका अशा शिक्षकाची गोष्ट आहे जो देशातील विविध कानोकोपऱ्यातील मुलांना शिक्षणाचं महत्त्व आणि त्यांना असा रस्ता दाखवतो जो लाखो लोकांना प्रेरणा देतो. अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलतो.
advertisement
6/8
ही सीरिज कोटा येथे शूट करण्यात आली आहे आणि येथील जवळजवळ 200 स्थानिक कलाकारांनी या सीरिजमध्ये काम केलं आहे. फिजिक्स वाला या ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्मचे फाऊंडर अलख पांडे यांच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे.
advertisement
7/8
प्रतिश मेहता दिग्दर्शित या सीरिजमध्ये विनीत कुमार सिंग मुख्य भूमिकेत आहेत. तर विक्रम कोचर, गिरिजा ओक गोडबोले आणि इतर अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  कोटा आणि बुंदी येथे ही सीरिज शूट करण्यात आली आहे.
advertisement
8/8
याआधी कोटा फॅक्टरी ही सीरिज देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जितेंद्र कुमारने यात महत्त्वाची भूमिका साकारली. या सीरिजचेही काही सीझन पाहायला मिळाले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गिरिजा ओकची 5 एपिसोडची सीरिज, Netflix वर येताच बनली नंबर वन; बायोग्राफिकल ड्रामा OTT वर हिट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल