TRENDING:

अभिनेत्री अर्चना पूरन सिंह करतेय गंभीर आजाराचा सामना, स्वतःच्या हाताने जेवणंही झालंय कठीण

Last Updated:
अभिनेत्री अर्चना पूरण सिंह एका दुर्मिळ आजाराचा सामना करत आहे. या आजारमुळे तिला तिच्या हाताने जेवणंही कठिण झालं आहे. नेमका हा आजार आहे तरी काय?
advertisement
1/7
अर्चना पूरन सिंह करतेय गंभीर आजाराचा सामना, स्वतःच्या हाताने जेवणंही कठिण
कपिल शर्मा शोमध्ये खुर्चीत बसून हसणारी अभिनेत्री अर्चना पूरन सिंह. पडद्यावर मोठ्यानं हसणारी अर्चना खऱ्या आयुष्यात मात्र खूप वेदना सहन करतेय. 2025 हे वर्ष तिच्यासाठी खूप अडचणींचं होतं. अर्चनाला असा एका दुर्मिळ आजार झाला ज्यामुळे ती स्वत: च्या हाताने जेवू देखील शकत नाहीये. अर्चना पूरन सिंहच्या मुलाने ही माहिती दिली आहे. 
advertisement
2/7
अर्चना आणि तिचा पती परमीत सेठी यांनी 2025 मध्ये त्यांच्या युट्यूब चॅनलची सुरुवात केली. त्यांचा मोठा मुलगा आर्यमान सेठीने गर्लफ्रेंडशी साखरपुडा झाला. मात्र या सगळ्या आनंदात अर्चनाच्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
advertisement
3/7
अर्चना पूरन सिंह सध्या एका दुर्मिळ आणि गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. तिचा दुसरा मुलगा आयुष्मान सेठी यानं एका व्हिडीओमधून ही माहिती चाहत्यांना दिली.  हा व्हिडीओ पाहताना अर्चना अक्षरशः भावूक झाली. अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले.
advertisement
4/7
सध्या अर्चना पूरन सिंह आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मोठ्या मुलगा आर्यमानचा वाढदिवस खास करण्यासाठी कुटुंबाने अनेक क्षण एकत्र घालवले. याच दरम्यान आयुष्मानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत 2025 मध्ये कुटुंबाने काय काय अनुभवलं हे सांगितलं.
advertisement
5/7
आयुष्मानने आपल्या व्लॉगमध्ये सांगितलं की, त्याला आई अर्चना, वडील परमीत, आजी-आजोबा, भाऊ आणि आपल्या पाळीव कुत्र्यांवर खूप अभिमान आहे. विशेषतः वडील परमीत सेठी यांनी 60 वर्षांच्या वयात यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा घेतलेला निर्णय त्याला प्रेरणादायी वाटतोय
advertisement
6/7
आई अर्चनाबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, "2025 हे वर्ष तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या हाताचं मनगट तुटलं आणि त्यानंतर तिला CRPS म्हणजेच ‘कॉम्प्लेक्स रीजनल पेन सिंड्रोम’ हा दुर्मिळ आजार झाला. या आजारामुळे अर्चनाचा हात पुन्हा कधीच पूर्वीसारखा होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे."  त्यामुळे अर्चनाला स्वतःच्या हाताने साधं जेवणसुद्ध जेवू शकत नाही. 
advertisement
7/7
इतक्या वेदना आणि अडचणी असूनही अर्चनाने हार मानलेली नाही. आयुष्मानने सांगितलं की, अर्चनाने 2-3 चित्रपट आणि एका वेब सीरिजचं शूटिंग केलं. सलग 30 दिवस शूटिंग करूनही तिने कधीही तक्रार केली नाही. 60 वर्षांनंतरही नवनवीन गोष्टी करण्याची तिची जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्री अर्चना पूरन सिंह करतेय गंभीर आजाराचा सामना, स्वतःच्या हाताने जेवणंही झालंय कठीण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल