लकी असतात अशा व्यक्ती ज्यांचा शरीरावर 'या' जागेवर असतात तीळ, ना नोकरी ना व्यवसाय, काहीही न करता होतात धनवान!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
प्रत्येक माणसाच्या शरीरावर कुठे ना कुठे 'तीळ' असतो. सामुद्रिक शास्त्रानुसार, हे तीळ केवळ त्वचेवरील डाग नसून ते तुमच्या भविष्यातील आर्थिक स्थितीचे आणि नशिबाचे महत्त्वाचे संकेत देतात.
advertisement
1/7

प्रत्येक माणसाच्या शरीरावर कुठे ना कुठे 'तीळ' असतो. सामुद्रिक शास्त्रानुसार, हे तीळ केवळ त्वचेवरील डाग नसून ते तुमच्या भविष्यातील आर्थिक स्थितीचे आणि नशिबाचे महत्त्वाचे संकेत देतात. काही ठिकाणी असलेले तीळ इतके शुभ असतात की, त्या व्यक्तीला कठोर परिश्रमाशिवाय किंवा नोकरीशिवायही अनपेक्षित मार्गाने धनलाभ होतो आणि ती व्यक्ती सुखी जीवन जगते.
advertisement
2/7
नाभीच्या जवळ तीळ: ज्या व्यक्तींच्या नाभीवर किंवा नाभीच्या अगदी जवळ तीळ असतो, त्यांना सामुद्रिक शास्त्रानुसार अत्यंत नशीबवान मानले जाते. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही अन्नाची किंवा पैशांची कमतरता भासत नाही. विशेषतः महिलांच्या नाभीवर तीळ असणे हे समृद्धी आणि ऐश्वर्याचे लक्षण आहे. यांना कुटुंबाकडून किंवा वारसाहक्काने मोठी संपत्ती मिळण्याचे योग असतात.
advertisement
3/7
उजव्या हाताच्या तळहातावर तीळ: जर तुमच्या उजव्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असेल आणि तुम्ही मूठ आवळल्यावर तो तीळ आत राहत असेल, तर तो 'धनसंचयाचा' संकेत आहे. अशा व्यक्तींच्या हातात पैसा खेळता राहतो. यांना व्यवसायात किंवा गुंतवणुकीत अचानक मोठे यश मिळते, ज्यामुळे त्यांना नोकरीवर अवलंबून राहावे लागत नाही.
advertisement
4/7
हनुवटीवर तीळ: हनुवटीवर तीळ असणाऱ्या व्यक्तींना 'स्थिर संपत्तीचे' मालक मानले जाते. यांना भौतिक सुखसोयींची ओढ असते आणि त्यांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होते. हे लोक स्वभावाने थोडे शांत असतात, पण त्यांची आर्थिक नियोजनाची ताकद त्यांना श्रीमंत बनवते.
advertisement
5/7
कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ: कपाळाच्या उजव्या बाजूला असलेला तीळ बुद्धिमत्ता आणि 'राजयोग' दर्शवतो. असे लोक आपल्या चातुर्याने आणि संपर्कांचा वापर करून कमी वयात मोठी प्रगती करतात. यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो आणि वयाच्या 30 नंतर यांचे नशीब हिऱ्यासारखे चमकते.
advertisement
6/7
कंबर किंवा पाठीवर तीळ: कंबरेवर तीळ असणाऱ्या व्यक्तींना फिरण्याची आणि आलिशान जीवन जगण्याची आवड असते. शास्त्रानुसार, पाठीवर तीळ असणे हे 'धनवान' होण्याचे सूचक आहे. अशा व्यक्तींना प्रवासाशी संबंधित कामातून किंवा अनपेक्षित लॉटरी, शेअर मार्केटमधून पैसा मिळण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
7/7
उजव्या गालावर तीळ: ज्यांच्या उजव्या गालावर तीळ असतो, त्यांच्यावर लक्ष्मीची विशेष कृपा असते. हे लोक स्वभावाने खूप कष्टाळू नसले तरी त्यांचे नशीब इतके प्रबळ असते की, त्यांना आयते यश आणि पैसा मिळतो. लग्नानंतर अशा व्यक्तींचे नशीब अधिक उजळते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
लकी असतात अशा व्यक्ती ज्यांचा शरीरावर 'या' जागेवर असतात तीळ, ना नोकरी ना व्यवसाय, काहीही न करता होतात धनवान!