तुम्ही फक्त पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाडला पाहत राहिलात; आणखी एका अभिनेत्रीनं गुपचूप उरकलं लग्न, कोण आहे ती?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actress Wedding : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. तुम्ही फक्त पूजा आणि प्राजक्ताचं लग्न पाहत राहिलात पण दुसरीकडे आणखी एका मराठी अभिनेत्रीनं गुपचूप लग्न उरकलं. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/9

मराठी मनोरंजन विश्वात लगीन सराई सुरू आहे. अनेक अभिनेत्री बोहल्यावर चढल्या असून मोठ्या थाटात लग्न केलं आहे. एकापाठोपाठ एकाच दिवशी तीन अभिनेत्रींची लग्न लागली.
advertisement
2/9
'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारी हिचं नुकतंच लग्न झालं. पूजा बांदेकरांची सून झाली. पूजाने आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरबरोबर लग्न केलं.
advertisement
3/9
पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांचं ग्रँड लग्न लोणावळ्यात पार पडलं. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी दोघांच्या लग्नाला हजेरी लावली होती. मराठमोळ्या पद्धतीनं मोठ्या थाटात सोहम आणि पूजाचं लग्न लागलं.
advertisement
4/9
पूजा बिरारीबरोबर 'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं देखील लग्न केलं. शंभुराज खुटवडबरोबर तिनं लग्नगाठ बांधली. प्राजक्ता गायकवाडचं लग्न यंदाच्या वर्षातील ग्रँड वेडिंग ठरलं आहे.
advertisement
5/9
प्राजक्ता गायकवाडच्या शाही लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. प्राजक्ता आणि शंभुराज यांनी रिसेप्शनला नंदीवरून एन्ट्री घेतली. त्यांच्या या एन्ट्रीवरून सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलंय.
advertisement
6/9
प्राजक्ता गायकवाड आणि पूजा बिरारी यांच्याबरोबरच प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे हिनं देखील लग्न केलं आहे. भाग्यश्रीच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
advertisement
7/9
'कुंकू टिकली आणि टॅटू', 'रमा राघव' या मराठी मालिकेतून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं. 'माटी से बंधी डोर', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' सारख्या प्रसिद्ध हिंदी मालिकेतही तिनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमातही तिने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
advertisement
8/9
भाग्यश्रीनं तिच्या लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा आणि डिझानर ब्लाऊज असा पारंपरिक पोषाख भाग्यश्रीवर खुलून दिसत होता.
advertisement
9/9
उदय कुंडप असं अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेच्या नवऱ्याचं नाव आहे. उदय हा पेशानं डॉक्टर आहे. भाग्यश्रीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिलेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तुम्ही फक्त पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाडला पाहत राहिलात; आणखी एका अभिनेत्रीनं गुपचूप उरकलं लग्न, कोण आहे ती?