TRENDING:

पहिलीच फिल्म हिट! नंतर चित्रपटातून तब्बल 18 वर्षे 'गायब'; गेली कुठे ही अभिनेत्री?

Last Updated:
Actress : पहिल्याच फिल्ममधून प्रेक्षकांच्या मनात छाप सोडणारी ही अभिनेत्री, गेल्या 18 वर्षांत एकाही फिल्ममध्ये दिसली नाही.
advertisement
1/7
पहिलीच फिल्म हिट! नंतर चित्रपटातून तब्बल 18 वर्षे 'गायब'; गेली कुठे ही अभिनेत्री
2002 मध्ये प्रदर्शित झालेली ही फिल्म, ज्यातील कॉमेडी सीन अजूनही लोकांना हसवत आहेत. आता या फिल्मचा दुसरा पार्ट येतो आहे, त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. पण या फिल्ममधील मुख्य अभिनेत्री जिची ही पहिलीच फिल्म होती, ती गेल्या 18 वर्षांत एकही फिल्ममध्ये दिसली आहे, ती कुठे गायब झाली? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
advertisement
2/7
या अभिनेत्रीचं नाव आहे राधा. 'सुंदरा ट्रॅव्हल्स' या फिल्ममधील अभिनेत्री, तिची ही पहिलीच फिल्म. या चित्रपटात तिचा वास्तववादी अभिनय आणि सुंदर लूक लक्ष वेधून घेणारा होता. राधा आंध्र प्रदेशची आहे. तिला चित्रपटसृष्टीत रस होता. जेव्हा ती मॉडेलिंग आणि जाहिराती करत होती तेव्हाच तिला 'सुंदरा ट्रॅव्हल्स' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तामिळ प्रेक्षक तिच्याकडे सहज आकर्षित झाले.
advertisement
3/7
पण 'सुंदरा ट्रॅव्हल्स' च्या प्रचंड यशानंतरही तिला मोठ्या बजेटच्या फिल्ममध्ये किंवा प्रमुख कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. जंक्शन, गेम, अधावडी आणि कथावरायण सारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला होता पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. यामुळे ती तमिळ चित्रपटसृष्टीत 'स्टार'चा दर्जा मिळवू शकली नाही.
advertisement
4/7
'सुंदरा ट्रॅव्हल्स' नंतर काही काळ तिला चित्रपटांच्या संधी नसताना तिला विविध संघर्षांना सामोरं जावं लागले. राधाचं नाव चित्रपट बातम्यांपेक्षा गुन्हेगारी आणि राजकीय बातम्यांमध्ये जास्त होते. चेन्नईमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाने तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन देऊन तिची फसवणूक केल्याची तक्रार तिने केली होती. अनेक महिने हा मीडियामध्ये चर्चेचा विषय होता.
advertisement
5/7
यानंतर ती मालिकांकडे वळली. विजय टीव्हीवरील भारती कन्नम्मा 2 आणि कलैग्नार टीव्हीवरील पवित्रा या मालिकेत खलनायिकेची भूमिका तिने केली होती. या मालिकेनंतर आता ती पुन्हा फिल्ममध्ये परतत आहे. पण तिला पाहून चाहते शॉक झाले आहे.
advertisement
6/7
हा तिचा अलीकडील फोटो आहे. ती इतकी बदलली आहे की लोकांना तिला ओळखताही येत नाही आहे. अनेकांना ही सुंदरा ट्रॅव्हल्समधील राधाच आहे का? असा प्रश्न पडला आहे. यात तिचं वजन वाढलेलं दिसतं आहे.
advertisement
7/7
अलीकडेच राधाचा 'स्वीटी नट्टी क्रेझी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचप्रमाणे तिला विजय अँटनीसोबत 'वेट्टू' या चित्रपटात संधी मिळाली आहे. यासह ती तमिळ चित्रपटसृष्टीत पुन्हा उतरली आहे. तिच्या 'सुंदरा ट्रॅव्हल्स'चा दुसरा भाग 'सुंदरा ट्रॅव्हल्स सुपर फास्ट'ही येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिलीच फिल्म हिट! नंतर चित्रपटातून तब्बल 18 वर्षे 'गायब'; गेली कुठे ही अभिनेत्री?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल