TRENDING:

प्रार्थना बेहरेइतकीच सुंदर, स्मार्ट आहे निर्मिती सावंत यांची खरी सूनबाई; एका कंपनीची मालकीण

Last Updated:
Aga Aga Sunbai Kai Mhantai Sasubai : अगं अगं सुनबाई ! काय म्हणताय सासूबाई? सासूसुनेच्या नात्यावरील ही मराठी फिल्म अनेकांना भावते आहे. या फिल्ममध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सूनेची आणि निर्मिती सावंत यांनी सासूची भूमिका साकारली आहे. पण खऱ्या आयुष्यात निर्मिती सावंत यांची सून कोण आहे, ती काय करते माहिती आहे का?
advertisement
1/5
प्रार्थनाइतकीच सुंदर, स्मार्ट निर्मिती सावंत यांची खरी सून; एका कंपनीची मालकीण
चित्रपट, मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या निर्मिती सावंत वर्षानुवर्षे मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांचं मनोरंजन करत आहेत. कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, हप्ता बंद, कॉन्स्टेबल कामना कामतेकर या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. आजही या मालिका सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.
advertisement
2/5
झी मराठी वरील फु बाई फु या शोमध्ये जज म्हणून दिसल्या होत्या. कित्येक फिल्ममध्येही त्या दिसल्या आहेत, नुकतीच त्यांची फिल्म अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? या फिल्ममध्ये झळकल्या आहेत.
advertisement
3/5
निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत हादेखील उत्तम अभिनेता आहे. आजवर तो अनेक मालिकांमध्ये झळकला आहे. अभिनयने पूर्वा पंडित हिच्यासोबत लग्न केलं आहे.
advertisement
4/5
निर्मिती सावंत यांचे सून पूर्वासोबतही सोशल मीडियावर अनेक फोटो आहेत. पूर्वा आपले सासूसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
advertisement
5/5
पूर्वा हीसुद्धा एक कलाकार आहे. ती डुडल आर्टिस्ट आहे. पूर्वाची स्वत:ची एक डुडल कंपनी आहे. त्यामुळे ती स्वत: तिच्या हाताने डूडल्स तयार करत असते. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रार्थना बेहरेइतकीच सुंदर, स्मार्ट आहे निर्मिती सावंत यांची खरी सूनबाई; एका कंपनीची मालकीण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल