Aishwarya Rai : अभिषेकसोबत ठरलेलं लग्न, ऐश्वर्याने भलत्याच अभिनेत्याला केलेलं Kiss, बच्चन कुटुंबाची उडालेली झोप
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न ठरलं होतं. याचवेळी ऐश्वर्याने एका सिनेमात अभिनेत्याला किस केलं होतं. ऐश्वर्यामुळे बच्चन कुटुंबाची झोप उडाली होती.
advertisement
1/8

अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. अनेक दमदार सिनेमे तिने बॉलिवूडला दिले. पण 19 वर्षांआधी आलेल्या एका सिनेमात ऐश्वर्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता. या सिनेमात तिने दिलेल्या एका किसींग सीननं चांगलीच खळबळ उडाली होती.
advertisement
2/8
या सिनेमात ऐश्वर्या रायचा आतापर्यंतचा सर्वात स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. संपूर्ण सिनेमात तिच्या लूकनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तो सिनेमा म्हणजे 'धूम 2'. ऐश्वर्याच्या करिअरमधील हा एक महत्त्वाचा सिनेमा मानला जातो.
advertisement
3/8
यशराज फिल्म्सचा धूम 2 हा सुपरहिट सिनेमा रिलीज होऊन आला 19 वर्ष झाली आहे. धूम या सिनेमाचा हा सिक्वेल होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
advertisement
4/8
'धूम 2' मध्ये हृतिक रोशन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, उदय चोप्रा, बिपाशा बसू आणि रिमी सेन हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. ऋतिकची या सिनेमात निगेटीव्ह भूमिका होती. त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमधील ही सर्वात लोकप्रिय भूमिका ठरली.
advertisement
5/8
या सिनेमात ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांचा 20 सेकंदाचा एक किसींग सीन होता. ऐश्वर्याचा हा पहिलाच ऑनस्क्रिन किसींग होता. याच काळात ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं नात पक्क झालं होतं. त्यामुळे बच्चन कुटुंब ऐश्वर्याच्या या सीनवर नाराज होते. त्यांनी सिनेमातून हा सीन काढून टाकावा यासाठी विनंती केल्याचं बोललं जातं. पण निर्मात्यांनी यासाठी नकार दिला.
advertisement
6/8
एका मुलाखतीत बोलताना ऐश्वर्याने सांगितलं होतं की, त्या काळात किसिंग सीन नॉर्मल झाले होते. बदलत्या काळानुसार हे सीन चित्रित करण्यात आले. हा फक्त रोमँटिक सीन नव्हता त्यात डायलॉग देखील होते." ऐश्वर्याला ऑन-स्क्रीन किस करण्यास फारसं सोयीस्कर वाटत नव्हतं असंही ती म्हणाली.
advertisement
7/8
आदित्य चोप्राने ऐश्वर्याला तिच्या भूमिकेसाठी 10 दिवसांत 5 किलो वजन कमी करण्यास सांगितलं होतं. भूमिकेत ती परफेक्ट आणि फिट दिसावी यासाठी ऐश्वर्याने खूप मेहनत घेतल्याचं सांगितलं जातं. या सिनेमातील तिचा लूक, कपडे सगळंच वेगळं ठरलं.
advertisement
8/8
35 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'धूम 2' ने रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर 151 कोटींची कमाई केली होती. 'धूम 2' हा 2006 या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aishwarya Rai : अभिषेकसोबत ठरलेलं लग्न, ऐश्वर्याने भलत्याच अभिनेत्याला केलेलं Kiss, बच्चन कुटुंबाची उडालेली झोप