3 तास 34 मिनिटांची ही सुपरहिट फिल्म, 40 दिवसांनंतरही गाजवतेय थिएटर, आज पाहा फक्त 149 रुपयांत
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Movies : बॉलिवूडची एक सुपरहिट फिल्म रिलीजच्या 40 दिवसांनंतरही थिएटर गाजवत आहे. पण आता आज प्रेक्षकांना ही फिल्म फक्त 149 रुपयांत पाहता येणार आहे.
advertisement
1/7

रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांचा 3 तास 34 मिनिटांचा 'धुरंधर' हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होऊन 40 दिवस झाले आहेत. पण रिलीजच्या 40 दिवसांनंतरही या फिल्मची क्रेझ कमी झालेली नाही. आजही ही फिल्म थिएटर गाजवतेय.
advertisement
2/7
'धुरंधर'च्या निर्मात्यांनी 13 जानेवारी 2026 रोजी एक खास ऑफर ठेवली आहे. आज ही फिल्म प्रेक्षकांना फक्त 149 रुपयांत पाहता येणार आहे. फक्त एका दिवसासाठी असणाऱ्या या ऑफरचा प्रेक्षक नक्कीच फायदा घेताना दिसणार आहेत.
advertisement
3/7
रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या अॅक्शनने भरलेल्या 'धुरंधर' या फिल्मने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन आणि सारा अर्जुन यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. सर्व कलाकारांनी आपल्या-आपल्या भूमिकांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे, त्यामुळे चित्रपटात अ‍ॅक्शन, सस्पेन्स आणि देशभक्तीचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो.
advertisement
4/7
'धुरंधर' या चित्रपटाची कथा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संबंधित खऱ्या घटनांवर आधारित आहे. हा एक स्पाय थ्रिलर असून, यात भारतीय गुप्तचर एजंट्सचे पाकिस्तानमधील गुप्त मिशन दाखवण्यात आले आहे.
advertisement
5/7
रणवीर सिंहने एका धाडसी आणि निर्भय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. त्याने आपल्या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर अक्षय खन्नाची क्रेझ मात्र वेगळीच आहे. एकंदरीतच प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी ही फिल्म आहे.
advertisement
6/7
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ने जबरदस्त विक्रम केले आहेत. हा आता हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. याने ‘पुष्पा 2’ च्या हिंदी कलेक्शनला (821 कोटी) मागे टाकले आहे.
advertisement
7/7
'धुरंधर'ने भारतात आतापर्यंत 831 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात 1200 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कमाईच्या बाबतीत पाहिले तर: ‘छावा’ ने हिंदीमध्ये 601 कोटी, ‘जवान’ ने 586 कोटी कमावले आहेत. इतर 500 कोटी क्लबमधील चित्रपटांमध्ये ‘स्त्री 2’, ‘गदर 2’, ‘पठाण’, ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘बाहुबली 2’ यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
3 तास 34 मिनिटांची ही सुपरहिट फिल्म, 40 दिवसांनंतरही गाजवतेय थिएटर, आज पाहा फक्त 149 रुपयांत