T20 World Cup पूर्वी ऑस्ट्रेलियाला 'जोर का झटका', तब्बल आठ ICC ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कॅप्टनचा क्रिकेटला रामराम!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Australia Captain Alyssa Healy Retirement : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची दिग्गज कर्णधार अलिसा हिली हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताविरुद्धच्या आगामी मल्टि-फॉर्मेट मालिकेनंतर ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल.
advertisement
1/7

आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. अशातच आता ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर मिचेल स्टार्कच्या पत्नीने निवृत्ती जाहीर केली आहे.
advertisement
2/7
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिलीने मार्चमध्ये भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महिला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक अशी तिची ओळख आहे.
advertisement
3/7
आगामी वुमेन्स टी-ट्वेंची वर्ल्ड कपच्या आधी एलिसा हिलीने निवृत्तीची घोषणा केली. भारताविरुद्धच्या मालिकेत ती अखेरचा सामना खेळेल. त्याआधी 35 वर्षीय खेळाडू क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
advertisement
4/7
आपल्या निवृत्तीची घोषणा करताना हिली भावूक झाली होती. ती म्हणाली, मिश्र भावनांसह मी जाहीर करत आहे की, आगामी भारताविरुद्धची मालिका ही माझी ऑस्ट्रेलियासाठी शेवटची मालिका असेल.
advertisement
5/7
देशासाठी खेळण्याची ओढ अजूनही मनात आहे, पण सुरुवातीपासून जी जिद्द आणि 'कॉम्पिटिटिव्ह एज' मला प्रेरित करत होती, ती कुठंतरी कमी झाल्यासारखी वाटतेय. त्यामुळे थांबण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असंही हिली म्हणाली.
advertisement
6/7
आपल्या भावना व्यक्त करताना ती पुढे म्हणाली, "मला माझ्या संघसहकाऱ्यांची, विजयानंतर गायल्या जाणाऱ्या गाण्यांची आणि ऑस्ट्रेलियासाठी सलामीला फलंदाजीला जाण्याची खूप आठवण येईल"
advertisement
7/7
आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता आणि शेवटची एकदा 'ग्रीन अँड गोल्ड' जर्सी घालून मैदानात उतरण्याची संधी मिळत असल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असं देखील हिली म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup पूर्वी ऑस्ट्रेलियाला 'जोर का झटका', तब्बल आठ ICC ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कॅप्टनचा क्रिकेटला रामराम!