Akshaye Khanna पुन्हा थिएटर गाजवायला सज्ज! नव्या वर्षात रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म, OTT ही गाजवणार
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Akshaye Khanna Upcoming Films : अक्षय खन्नासाठी 2025 हे वर्ष खूप खास ठरलं. 2025 मधील त्याचे 'छावा' आणि 'धुरंधर' हे सिनेमे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. आता अभिनेत्याच्या आगामी फिल्मची चाहत्यांना उत्सुकता आहे.
advertisement
1/7

अक्षय खन्ना गेल्या 28 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रीय आहे. 2025 हे वर्ष त्याच्यासाठी खूप खास ठरलं. वर्षाच्या सुरुवातीला 'छावा'मधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तसेच वर्षाच्या शेवटी रिलीज झालेला 'धुरंधर' सध्या देशभरात गाजत आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत हा खलनायक भाव खाऊन जात आहे.
advertisement
2/7
'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचे आणखी चार नव्या फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच अक्षय खन्ना ओटीटीवर पदार्पण करण्यास सज्ज आहे. विशेष म्हणजे 28 वर्षांनी सनी देओलसोबत झळकणार आहे.
advertisement
3/7
अक्षय खन्नाच्या 'दृश्यम 3' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सध्या या चित्रपटाच्या संहितेवर काम सुरू आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अक्षय खन्नाने साकारलेलं पात्र महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. विजय सालगांवकरला मात देताना तो दिसेल.
advertisement
4/7
'दृश्यम 3'सह अक्षय खन्नाच्या पाइपलाईनमध्ये 'धुरंधर 2'देखील आहे. पुन्हा एकदा या चित्रपटात रहमान डकैतच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकणार आहे. रहमान डकैतची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ सीक्वेलमध्ये आणखी जबरदस्त पद्धतीने दाखवण्यात येईल.
advertisement
5/7
अक्षय खन्ना 'सेक्शन 84' या कोर्टरूम ड्रामा फिल्म मध्येही दिसणार आहे. अक्षय खन्नासोबत सध्या या चित्रपटाबाबत बोलणी सुरू आहेत.
advertisement
6/7
अक्षय खन्नाला एका अनटाइटल्ड स्पाय थ्रिलर चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला आहे. या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी त्याला विचारणा होत आहे.
advertisement
7/7
अक्षय खन्ना नेटफ्लिक्सच्या आगमी 'इक्का' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित ही फिल्म 2026 मध्ये ओटीटीवर रिलीज होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akshaye Khanna पुन्हा थिएटर गाजवायला सज्ज! नव्या वर्षात रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म, OTT ही गाजवणार