TRENDING:

Amitabh Bachchan : आते हैं! अमिताभ बच्चन यांचे धडाधड 3 ट्वीट, चाहत्यांची चिंता वाढली

Last Updated:
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आज वयाच्या 83 व्या वर्षीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. पण सध्या धडाधड तीन ट्वीट केल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे नेटिझन्सची चिंता वाढली आहे.
advertisement
1/7
अमिताभ बच्चन यांचे धडाधड 3 ट्वीट, चाहत्यांची चिंता वाढली
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रीय आहे. बिग बी नियमित ट्वीट करतात. पण 6 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी धडाधड तीन ट्वीट केले आहेत. त्यांच्या या ट्वीटने चाहते आणि नेटिझन्स चिंतेत आहेत.
advertisement
2/7
अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून आपल्या ब्लॉग आणि ट्वीटच्या माध्यमातून चाहत्यांना धक्के देत आहेत. कधी मध्यरात्री तर कधी पहाटे ते ट्वीट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. पण अमिताभ बच्चन यांनी नुकतच केलेल्या तीन ट्वीटचा अर्थ नेमका काय आहे? हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. चाहते आणि नेटिझन्स आपापल्या पद्धतीने या ट्विटचा अर्थ काढू लागले आहेत.
advertisement
3/7
अमिताभ बच्चन यांनी पहिलं ट्वीट 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:01 वाजता केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे,"आते हैं". यावर नेटकऱ्यांनी काय झालं? आम्ही वाट पाहतोय, हे तुम्ही 52 वर्षांपूर्वीदेखील म्हणाला होतात, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. एका नेटकऱ्याने तर थेट "रेखा जींच्या घरी जाताय का?", असं विचारलं आहे.
advertisement
4/7
अमिताभ बच्चन यांनी दुसरं ट्वीट 6 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1:20 मिनिटांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे,"आ गये! क्या कर लोगे? हैं". अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी आम्ही काही करणार नाही, जयाजींना सांगू का? जलसामध्ये जेवण झालं का? अशा कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
5/7
अमिताभ बच्चन यांनी तिसरं ट्वीट 6 डिसेंबर 2025 रोजी 1.22 ला केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे,"सालों साल पहले भी हुआ था, निष्कल रहा, अब्भी यही होगा!!! निष्फल". या ट्वीटवर म्हणायचं काय आहे तुम्हाला?, जयाजींना समजावण्याचा प्रयत्न, तुमच्या या ट्वीटचा नक्की अर्थ काय? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
advertisement
6/7
अमिताभ बच्चन यांना धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मोठा धक्का बसला होता. 'कुछ क्षण, जीवन के जीना' असं ट्वीट त्यांनी केलं होतं. यावरुन धर्मेंद्र यांना निधनाने बिग बींना किती दु:ख झालंय हे जाणवत होतं. सहकलाकारासह आपला जवळचा मित्र गमावल्याचं त्यांना वाईट वाटत होतं.
advertisement
7/7
अमिताभ बच्चन हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील महान अभिनेते आहेत. गेल्या अनेक दशकांपासून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आज वयाच्या 83 व्या वर्षीही 'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amitabh Bachchan : आते हैं! अमिताभ बच्चन यांचे धडाधड 3 ट्वीट, चाहत्यांची चिंता वाढली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल