अमिताभ बच्चन दिवसाला ओढायचे 200 सिगारेट, दारूचंही होतं व्यसन, बिग बींनी स्वत:चं केला खुलासा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी एकदा खुलासा केला होता की ते दिवसाला 200 सिगारेट ओढत असे. तसेच त्यांना दारूचंही व्यसन होतं.
advertisement
1/7

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या 'जंजीर','दीवार', 'अँग्री यंग मॅन' या फिल्म अनेकदा पाहिल्या जातात. आपला शांत स्वभाव आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जाणारे अमिताभ बच्चन एकेकाळी 200 सिगारेट ओढत असे.
advertisement
2/7
अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, पूर्वी मी मटनावर ताव मारत असे, दारूचं व्यसन होतं. तसेच सिगारेटदेखील ओढत असे".
advertisement
3/7
अमिताभ बच्चन पूर्वी दिवसाला 200 सिगारेट ओढत असे. अमिताभ बच्चन म्हणतात,"हो. हे खरं आहे की मी दिवसाला 200 सिगारेट ओढायचो. कोणत्या विशिष्ट ब्रँडकडे लक्ष न देता कोणत्याही प्रकारची दारू मी प्यायचो".
advertisement
4/7
अमिताभ म्हणाले,"पूर्वी मी व्यसन करत असलो तरी आता मात्र मी सर्वकाही सोडलं आहे. मी सिगारेट ओढत नाही, दारू पित नाही आणि नॉन-व्हेजदेखील खात नाही".
advertisement
5/7
अमिताभ बच्चन पुढे म्हणालेले,"माझे वडील सिगारेट ओढत नसे. दारू पित नसे आणि मटनदेखील खात नसे. माझे वडील पूर्णपणे शाकाहारी होते. पण माझी आई मात्र आवडीने नॉन-व्हेज खात असे. आईप्रमाणे जयादेखील मासांहार करते".
advertisement
6/7
आपल्या शांत स्वभावाबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणालेले,"मी हिंसक व्यक्ती आहे, असं मला वाटत नाही. कॉलेजमध्ये असताना मी भांडणे, वाद केले असतील. पण त्यानंतर मी शांत राहणंचं पसंत केलं".
advertisement
7/7
अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती 17' या कार्यक्रमाचं शूटिंग करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. अमिताभ बच्चन यांचा 'कल्कि 2898 AD-पार्ट 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अमिताभ बच्चन दिवसाला ओढायचे 200 सिगारेट, दारूचंही होतं व्यसन, बिग बींनी स्वत:चं केला खुलासा