स्टार स्पोर्ट्सवर बोलताना, गावसकर यांनी त्यांचा अंतिम अकरा खेळाडू जाहीर केले. त्यांनी रिंकू सिंग आणि इशान किशन यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे. तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांना ओपनर म्हणून संधी दिली आहे. तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, त्यानंतर हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल खेळतील, असं गावसकर म्हणाले आहेत.
advertisement
दरम्यान गावसकर यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधून वॉशिंग्टन सुंदरला वगळलं आहे. गावसकरांच्या टीममध्ये स्पिनर म्हणून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग फास्ट बॉलर असतील. टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारतीय टीम टी-20 वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी यूएईविरुद्ध खेळेल.
सुनील गावसकरांची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
